💰 करदात्यांना मोठा दिलासा; टॅक्स स्लॅबमध्ये बदल :
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आधी सादर करण्यात आलेल्या पूर्ण अर्थसंकल्पात अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. आता, करपात्र उत्पन्नाची मर्यादा सात लाख इतकी करण्यात आली आहे. मात्र, हा फायदा नवीन कररचनेनुसार कर भरणाऱ्यांसाठी आहे.
😎 अर्थसंकल्पामध्ये काय महागलं, काय स्वस्तं झालं? :
अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त होणार याबद्दलही अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे. त्यानुसार एलईडी टीव्ही, कपडे, मोबाईल फोन, खेळणी, मोबाईल कॅमेरा लेन्स, इलेक्ट्रीक वाहने, बायोगॅसशीसंबंधीत वस्तू, लिथियम सेल्स, सायकल स्वस्त झाले. तर सिगारेट, मद्य, छत्री, विदेशी किचन चिमनी, सोने, आयात केलेले चांदिचे सामान, प्लेटिनम, एक्स-रे मशीन, हिरे महागले.
📣 शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा :
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी विशेष डिजिटल प्लॅटफॉर्म स्थापन करण्याची घोषणा केली आहे. शेतीसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. विशेषतः कृषी स्टार्टअप सुरू करण्यासाठी ग्रामीण भागात कृषी वर्धक निधीची स्थापना केली जाईल, असे अर्थमंत्री म्हणाल्या. या तरतुदींमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळणार असल्याचा दावा केला जात आहे.
🏠 अर्थसंकल्पात पंतप्रधान आवास योजनेसाठी मोठी तरतूद :
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. निर्मला सीतारमण यांनी परवडणाऱ्या घरांच्या योजनेसाठी आणखी बळ दिले आहे. पंतप्रधान आवास योजनेसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. आधीच्या तुलनेत पीएम आवास योजनेत तब्बल 66 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
🚆 रेल्वेसाठी 2.40 लाख कोटी रुपयांची तरतूद :
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी भारताला वंदे भारत 2.0, हायड्रोजन ट्रेनची भेट दिली आहे. यासोबतच यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2.40 लाख कोटी रुपयांची तरतूद केल्याचंही त्यांनी जाहीर केलं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. 2013 सालचा विचार करता नऊ पटीने बजेट वाढवल्याचं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं.
🔝 मुकेश अंबानी पुन्हा 'नंबर वन' श्रीमंत :
भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी गौतम अदानी यांना मागे टाकले आहे. मुकेश अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. शेअर बाजारातील 'धोबीपछाड'मुळे अदानींना मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. यामुळे अंबानींना फायदा झाला असून ते पुन्हा 'नंबर वन'वर पोहोचले आहेत. फोर्ब्स श्रीमंतांच्या यादीनुसार, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 84.3 ब्ज डॉलर झाली आहे.