'50 खोके एकदम ओके' गद्दारांना टोला अन् होळीच्या शुभेच्छा; पोरांचा नादच खुळा!
सध्या धुलिवंदनानिमित्त सगळीकडे जल्लोष पाहायला मिळत आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी देशभरात मोठ्या प्रमाणावर रंग खेळला जातो. तर लहान मुलांच्या धुलीवंदनाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांनी पाठीवर ५० खोके एकदम ओके असं लिहिल्याचं दिसत आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.
सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.
No comments:
Post a Comment