Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    दिवसभरातील ताज्या घडामोडी



    दिवसभरातील ताज्या घडामोडी 


    👍 लोकसभेसाठी 'मविआ'चे जागावाटप ठरले :


    लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला आहे. यामध्ये शिवसेना 21, राष्ट्रवादी काँग्रेस 19 आणि काँग्रेस 8 जागा लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. 5 ते 6 जागांबाबत एकमत न झाल्याने त्यावर पुन्हा चर्चा होऊ शकते. लोकसभा अवघ्या एका वर्षावर आल्या आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत.


    🗣️ कपिल सिब्बल यांचे एकनाथ शिंदेंवर आरोप :


    मुख्यमंत्री बनण्यासाठीच एकनाथ शिंदे यांनी सरकार पाडले, असा आरोप आज सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. तसेच, सरकार पाडण्यासाठी राज्यपालांचाही वापर करण्यात आला, असेही कपिल सिब्बल म्हणाले. राज्याच्या सत्तासंघर्षावर सध्या घटनापीठासमोर युक्तिवाद सुरू आहे. 


    🤓 अमृता फडणवीसांना 1 कोटींच्या लाचेची ऑफर :


    उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना तब्बल 1 कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न झाला आहे. अमृता यांनी यासंबंधी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, अनिक्षा नामक महिला डिझायनर व तिच्या वडिलांनी त्यांना लाच देण्याचा प्रयत्न केला. अमृता यांच्या तक्रारीत लाच ऑफर करण्यासह धमकी व कट कारस्थानाचा उल्लेख आहे.


    👀 देशात इन्फ्लूएंझा H3N2 चा धोका वाढला :


    दिल्ली, गुजरात, महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये H3N2 विषाणूचा धोका वाढला आहे. या विषाणूमुळे देशात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर या विषाणूचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात झाला आहे. आतापर्यंत येथे विषाणूची 352 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. बीएमसीच्या म्हणण्यानुसार, मुंबईत 32 रुग्ण दाखल आहेत, त्यापैकी 4 H3N2 आणि 28 रुग्ण H1N1 चे आहेत. या सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे.


    🔎 मनी लाँडरिंग खटल्यांवर EDची आकडेवारी जाहीर :


    अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) म्हटले आहे की, त्यांच्या एकूण ECIR खटल्यांपैकी केवळ 2.98 टक्के खटले हे आजी किंवा माजी खासदार आणि आमदारांविरुद्ध दाखल आहेत, तथापि मनी लाँडरिंगविरोधी कायद्यांतर्गत दोषसिद्धीचा दर 96 टक्के इतका उच्च आहे. तपास संस्थेने ती लागू करत असलेल्या तीन कायद्यांतर्गत आपल्या कारवाईचा 31 जानेवारी 2023 अद्ययावत डेटा प्रकाशित केला आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad