गुढीपाडवा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘आनंदाचा शिधा’
गुढीपाडवा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘आनंदाचा शिधा’
लातूर, दि. 22 (जिमाका) : राज्याच्या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार गुढीपाडवा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पात्र शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ वितरीत केला जाणार आहे. लातूर येथे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. हस्ते रास्त भाव दुकान क्रमांक 77 आणि 10 येथे 'आनंदाचा शिधा' वितरणास प्रारंभ झाला. यावेळी त्यांच्या हस्ते दिव्यांग लाभार्थ्यांना शिधा वितरण करण्यात आले.
उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सावंत यांच्यासह लाभार्थी, नागरिक यावेळी उपस्थित होते.
अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबांना गुढीपाडवा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वितरीत करण्याबाबतची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सुमारे 4 लक्ष 10 हजार 548 कुटुंबांना 'आनंदाचा शिधा' मिळणार आहे. गुढीपाडवा ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंतच्या कालावधीत सर्व पात्र कुटुंबांना 'आनंदाचा शिधा' वितरित केला जाणार आहे.
No comments