भरधाव ट्रकने दुचाकीला उडवलं; दोन शिक्षकांचा जागीच मृत्यू
भरधाव ट्रकने दुचाकीला उडवलं; दोन शिक्षकांचा जागीच मृत्यू
रामेश्वर कदम आणि गंगाधर राऊळ अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकांची नावे आहेत. दोन्ही शिक्षक मानवत येथील शकुंतला विद्यालयातील असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कदम आणि राऊळ हे दोघेही शिक्षक दुचाकीवरून आज पहाटेच्या सुमारास महाविद्यालयात निघाले होते.
मानवत शहरातून जाणाऱ्या कल्याण ते निर्मल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वर दुचाकी आली असता समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये दोन्ही शिक्षकांची जागीच मृत्यू झाला आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही शिक्षकांचे मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. या घटनेनंतर ट्रकचालक हा पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

No comments