राज्यस्तरीय संपात सोयगांव तालुक्यातील सरकारी,निमसरकारी कर्मचारी यांचा सहभाग नोंदविण्याचा निर्धार...!
राज्यस्तरीय संपात सोयगांव तालुक्यातील सरकारी,निमसरकारी कर्मचारी यांचा सहभाग नोंदविण्याचा निर्धार...!
सोयगाव प्रतिनिधि मुश्ताक शाह
•••••••••••••
नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत लागणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणी साठी राज्य सरकारी,निमसरकारी कर्मचारी,शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीने ता.१४ मार्च पासून बेमुदत संपाची हाक दिलेली असुन या संपात सोयगांव तालुक्यातील सरकारी,निमसरकारी,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवावा यासाठी जुनी पेन्शन हक्क संघटना,शिक्षक संघटना,ग्रामसेवक संघटना,कृषी कर्मचारी संघटना,आरोग्य कर्मचारी संघटना,तहसील कर्मचारी संघटना यांनी निर्धार केलेला असून.जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी ही मागणी केली आहे.यावेळी सोयगांव शहरातील सर्व शासकीय निमशासकिय कार्यालयात जाऊन सर्व कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी व्हावे करीता आवाहन जुनी पेन्शन हक्क संघटना,शिक्षक संघटना,ग्रामसेवक संघटनांच्या प्रतिनिधीनी केले आहे.यावेळी शिक्षक भारती संघटनेचे तालुकाध्यक्ष किरण पाटील,नितेश गवांदे,किशोर जगताप, नरेंंद्र बारी,रविंद्र तायडे,सुपडू सोनवणे,जुनी पेंशन हक्क संघटनेचे कार्याध्यक्ष महेश गव्हांदे,शिक्षक सेनेचे रमेश भोलाणे,जगदीश शेलवडकर,जिल्हा परीषद कर्मचारी महासंघाचे तालुकाध्यक्ष गणेश गवळे,सत्यनारायण पुल्लेवाड,विकास भारती,संतोष पडघण,अमोल गायकवाड, अमोल सानप, जगदीश लाडे यांच्या सह आदी कर्मचारी उपस्थित होते.

No comments