Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    दिवसभरातील ताज्या घडामोडी

    दिवसभरातील ताज्या घडामोडी


    👍 करदात्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! :


    आता करदात्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयकर विभागाने AIS नावाचे एक नवीन App लॉन्च केले आहे. या अ‍ॅपमध्ये करदात्यांना प्रत्येक व्यवहाराची संपूर्ण माहिती मिळणार आहे. तसेच IT विभागाने फॉर्म २६AS वर अपडेट जारी केले आहे. त्यात फक्त तुम्हाला TDS/TCS डेटा दिसतो. अ‍ॅडव्हान्स टॅक्स, सेल्फ-असेसमेंट टॅक्स, रिफंड यासारखी माहिती आता AIS अ‍ॅपवर उपलब्ध असणार आहे.


    🚨 पीएम आवास योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी ईडीची कारवाई :


    पंतप्रधान आवास योजना गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. ईडीने छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण नऊ ठिकाणी छापेमारी केली. गैरव्यवहारप्रकरणी एक कंत्राटदार, एक डॉक्टर आणि इतर ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहेत. पंतप्रधान आवास योजनेत 400 कोटींपेक्षा जास्त मोठा घोटाळा झाल्याचं बोललं जात आहे.



    💥 पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कारची ट्रकला पाठीमागून धडक :


    मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर भरधाव कारची एका ट्रकला मागून जोरात धडक बसली. या भीषण अपघातात कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. शुक्रवारी(17मार्च) सकाळी आढे गावाच्या हद्दीत हा अपघात झाला. एका मालवाहतूक ट्रकला भरधाव कारने पाठीमागून धडक दिली. यावेळी ट्रकच्या मागच्या बाजूने कार अडकली गेली. या भीषण धडकेत कारचा चक्काचूर झाला असून तिघांचा मृत्यू झाला आहे.


    🗣️ पवार संतापले; मुख्यमंत्री शिंदे धावत सभागृहात :


    सध्या चालू असलेल्या विधानसभा अधिवेशनात आज पुन्हा सत्ताधारी-विरोधी पक्ष आमने-सामने आले, त्याचं कारण ठरले विधानसभेतील मंत्र्यांची अनुपस्थिती. आज विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार ठराव मांडत असताना समोरच्या बाकावर मंत्री उपस्थित नसल्याचं धनंजय मुंडे यांनी सभागृहात सांगितलं. त्यांनी अध्यक्षाकडे तसा मुद्दा देखील उपस्थित केला.


    👀 'पत्रकार शशिकांत वारिसेंची हत्या जाणीवपूर्वक' :


    रत्नगिरी येथील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्या ही जाणूनबुजून करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने विधानपरिषदेत दिली आहे.  राजापूर येथील पत्रकार शशीकांत वारिसे यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या कुटूंबियांनी केला होता. यावरुन विरोधी पक्षाने देखील तितकीच जोरदार टीका केली होती. या प्रकरणाची चौकशी एसआयटी करत आहे असे देखील सराकरने सांगितले आहे.


    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad