पुण्यात शिवज्योत घेऊन जाणाऱ्या शिवभक्तांचा भीषण अपघात, ३५ जण जखमी

 


पुण्यात शिवज्योत घेऊन जाणाऱ्या शिवभक्तांचा भीषण अपघात, ३५ जण जखमी



पुणे: पुण्यातील ताथवडे परिसरात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मल्हारगडावरून लोणावळा येथील शिलाटणे येथे हे एका खासगी टेम्पोने निघालेल्या गावकऱ्यांचा भीषण अपघात झाला आहे. शिलाटणे गावाचे हे सर्व रहिवाशी असून ते टेम्पोने गावाकडे निघाले होते. मात्र वाटेतच हा अपघात घडला आहे.

गावकऱ्यांच्या टेम्पोला कंटेनरची धडक बसल्याने हा अपघात झाला आहे. यात ३० ते ३५ जण जखमी झाले असून त्यातील १० जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना सोमाटणे येथील पवना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वजण शीलाटणे गावचे रहिवासी असल्याचे माहिती समोर येत आहे.


याबाबत मिळालेली माहिती अशी की, मल्हार गडावरून लोणावळा येथील शिलाटने येथे खासगी टेम्पोने काही शिवभक्त शिवज्योत घेऊन निघाले होते. बंगरूळ - मुंबई बायपासवर असलेल्या ताथवडे येथे एका कंटेनरने या टेम्पोला पाठीमागून जोरात धडक दिली. त्यामुळे या टेम्पोत असणारे ३० ते ३५ जण जखमी झाले. त्यातील १० जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना रुग्णालय दाखल करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post