Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    धक्कादायक! जपानी तरूणीसोबत भारतात गैरवर्तन; बळजबरी भिजवलं, लावला रंग; Video Viral

     


    धक्कादायक! जपानी तरूणीसोबत भारतात गैरवर्तन; बळजबरी भिजवलं, लावला रंग; Video Viral


    भारतात पर्यटनासाठी आलेल्या जपानी तरूणीसोबत भारतीय तरूणांनी गैरवर्तन केल्याचा प्रकार आहे. होळीच्या दिवशी हा प्रकार घडला असून काही तरूणांनी मिळून जपानी तरूणीशी गैरवर्तन करत तिला बळजबरीने भिजवलं आणि रंग लावल्याची माहिती आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वर चांगलाच व्हायरल झाला आहे.

    व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही तरूण होळीच्या दिवशी रंग खेळताना दिसत आहेत. तर तीन ते चार जण जपानी मुलीच्या अंगाला बळजबरीने रंग लावताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर ही तरूणी तिथून निघून गेल्याचं व्हिडिओमध्ये दिसत असून हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे.


    दरम्यान, यावर अनेकांनी आपला संताप व्यक्त केला असून आपल्या घरातील महिलेसोबत आपण असं वर्तन करू का अशा शब्दांत तरूणांना सुनावलं आहे. पण ही घटना कुठे घडली आहे? आणि या व्हिडिओतील मुलगी खरोखर जपानी आहे की नाही याची माहिती समोर आली नसून सकाळ माध्यम या व्हिडिओची पुष्टी करत नाही.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad