बाईक चोरण्यासाठी चोरांनी शोधली नवी टेकनिक, हा व्हिडीओ पाहून पोलीसही होतील शॉक
चोरी करणं हा कायद्यानं गुन्हा आहे. जर तुम्ही पकडला गेलात तर तुम्हाला कठोर शिक्षा होऊ शकते. मात्र तरी देखील काही मंडळी झटपट पैसा कमावण्यासाठी हा गुन्हेगारीचा रस्ता निवडतात. अशाच काही बाईक चोरांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आधीच्या काळात लॉक तोडून बाईक चोरी केली जात होती. मग कंपन्यांनी त्यावर मार्ग शोधून काढला. बाईकचं लॉक बंद करण्याची सोय केली. पण या चोरांनी तर यावर सुद्धा मार्ग शोधून काढलाय. त्यांची ही नवी टेकनिक पाहून पोलीस सुद्धा शॉक होतील.
कशी झाली बाईकची चोरी?
Freepressjournal.in ने दिलेल्या वृत्तानुसार ही घटना मुंबईतील मालवणी या ठिकाणी घडली आहे. सर्वप्रथम बाईकवरून तीन तरुण मुलं आली. त्यांनी ज्या बाईकची चोरी करायची आहे तिचं बारीक निरिक्षण केलं. मग ही बाईक कशी चोरली जाऊ शकते याबाबत चर्चा केली. त्यानंतर त्यांना कोणी पाहात तर नाही ना? याची खात्री करून घेतली. अखेर तिघांपैकी एक जण पुढे जाऊन त्या बाईकवर बसला आणि त्या बाईकला त्यांनी दुसऱ्या बाईकच्या मदतीनं टो करून नेलं. पण त्यांची ही चोरी रस्त्यावरील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली. अन् आता हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ होतोय व्हायरल
पोलीस करतायेत प्रकरणाची चौकशी
मीडिया रिपोर्टनुसार ही बाईक एका वकिलाची होती. त्यानं या प्रकरणी पोलीस तक्रार केली असून पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. लवकरच या चोरांना पकडलं जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. गेल्या काही काळात बाईक चोरीच्या प्रकरणात वाढ झाली आहे. त्यामुळे आपल्या गाड्यांना व्यवस्थित लॉक करून ठेवा. बाईक असेल तर तिला हँडल लॉक करा असा सल्ला पोलिसांनी दिला आहे. (फोटो सौजन्य - @Diwakar_singh31/Twitter)
No comments