दिवसभरातील ताज्या घडामोडी
🤓 राऊतांच्या वक्तव्यानंतर दोन्ही सभागृहात गोंधळ:कामकाज तहकूब :
भाजप आणि शिवसेना गटाच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेत संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हक्कभंग दाखल करुन घेतला आहे. दोन दिवसांत चौकशी करुन 8 मार्च रोजी पुढील निर्णय जाहीर करेन असे अध्यक्ष यांनी जाहीर केले. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपकडून सभागृहात गोंधळ सुरुच होता. त्यानंतर दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे.
🗣️ देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना खडसावले :
संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दात निषेध नोंदवला. संजय राऊत हे विधानमंडळाला चोर म्हणत आहे. पण उद्धव ठाकरे हे याच सभागृहाचे सदस्य आहेत. मग आम्ही सर्वच चोर ठरतोय का असा संतप्त सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
🚍औरंगाबाद-उस्मानाबादची नावे बदलणार - एसटी महामंडळ :
औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांच्या नामांतराला मंजुरी मिळाल्यानंतर आणि त्यानुसार सरकार दरबारी कार्यवाही सुरू झाल्यानंतर आता एसटी महामंडळाने तातडीने पावले उचलली आहेत. औरंगाबाद बसस्टँडचे नाव ‘मध्यवर्ती बसस्थानक छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे नाव ‘मध्यवर्ती बसस्थानक धाराशिव’ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. तसेच जिथे जिथे औरंगाबाद नाव असेल तिथे तिथे छत्रपती संभाजीनगर हे नाव द्यावे असे आदेश महामंडळाने दिले आहेत.
🔥 गॅस सिलिंडर 50 रुपयांनी महाग :
आज म्हणजेच 1 मार्चपासून 3 मोठे बदल झाले आहेत. 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 50 रुपयांनी वाढली आहे. दिल्लीत याची किंमत 1103 रुपयांवर गेली आहे. होळीपूर्वी सामान्य जनतेसाठी हा मोठा धक्का आहे. त्याच वेळी, 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 350.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर आता 2119.50 रुपयांना मिळेल.
🏏 कांगारूंच्या फिरकीसमोर भारतीय फलंदाजांची शरणागती :
आजपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. भारताचा पहिला डाव 109 धावांवर संपला. आज सामन्याच्या सुरुवातीपासूनच ऑसी गोलंदाजांनी धुमाकूळ घातला आहे. विशेषत: भारतीय फलंदाजांना ऑस्ट्रेलियन फिरकीपटूंना खेळवण्यात अपयश आले. ऑस्ट्रेलियन फिरकीपटूंनी नऊ विकेट्स घेतल्या, तर शेवटची विकेट सिराज (0) धावबाद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 1 बाद 79 धावा केल्या होत्या.
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786
