Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    महिलांसाठी वर्षभरापासून मोफत प्रवास, २५ लाख महिलांना लाभ

     


     महिलांसाठी वर्षभरापासून मोफत प्रवास, २५ लाख महिलांना लाभ


    लातूर : शिक्षण क्षेत्रात लातूरचा दबदबा निर्माण झाल्याने आज हजारो विद्यार्थी लातूरला प्राधान्य देत आहेत. शिक्षणासाठी मुलींची संख्या लक्षणीय आहे. शाळा, महाविद्यालय, खासगी शिकवणी यासाठी या विद्यार्थिनींना बराच प्रवास करावा लागतो, त्यासाठी मोठा खर्च व्हायचा, पण आता गत वर्षभरापासून त्यांना मनपाने मोठा आधार दिलाय. आता या विद्यार्थिनी सिटी बसने मोफत प्रवास करत आहेत. महाराष्ट्र सरकारनं एसटीनं प्रवास करणाऱ्या महिलांना तिकिटामध्ये ५० टक्के सवलत दिलेली आहे. ती सवलत १७ मार्चपासून लागू झाली आहे. दुसरीकडे लातूर महापालिका क्षेत्रातील महिला प्रवाशांसाठी गेल्या एक वर्षापासून मोफत प्रवास सुरु आहे त्याची आज वर्षपूर्ती झाली आहे.
    लातूर शहर महापालिकेने वर्षभरापूर्वी महिलांसाठी मोफत सिटी बस सेवा सुरू केली होती. मनपाच्या या उपक्रमाला आज वर्ष झालं आहे. महिलांना मोफत सेवा देणारी लातूर महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका ठरली आहे. महिलांसाठी अतिशय महत्वाचा उपक्रम राबविणाऱ्या या महानगर पालिकेचे अंजली अविनाश पाटोळे या विद्यार्थिनीने आभार मानलेत. ती छत्रपती राजर्षी शाहू महाराज महाविद्यालय या महाविद्यालयात शिक्षण घेत असून, विविध ठिकाणी खासगी शिकवणीला ही जाते त्यामुळे तिचा दिवसभरातून प्रवासासाठी मोठा खर्च व्हायचा मात्र आता ती सिटी बस ने प्रवास करत असल्याने तिचे पैसे वाचत असून त्याचा उपयोग आता ती आता शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी करू शकते, असे ती सांगते.




    खासगी नोकरी करणाऱ्या सुनंदा ठाकरेही सिटी बसने दररोज मोफत प्रवास करतात. वाढत्या महागाईत महिलांना घराच (किचन) बजेट सांभाळताना मोठी कसरत करावी लागते. अगदी पाच दहा रुपयांपासून महिलांना विचार करावा लागतो. त्यामुळे महानगर पालिकेचा हा उपक्रम मोठा आधार देत असल्याचं त्या सांगतात. महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे त्यांची महिन्याला १२०० रुपयांची बचत होते. या बचतीचा उपयोग त्यांना महाग झालेलं सिलेंडर खरेदी करण्यासाठी होतो असही त्या आवर्जून सांगतात, तसेच मोदी सरकारला त्या सिलेंडरचे दर कमी करण्याचं आवाहन ही करतात.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad