जयहिंद लोकसंचलित साधन केंद्र लातूर पूर्व द्वारा नवतेजस्विनी दूध संकलन केंद्राचे , कातपूर येथे उदघाटन - latursaptrangnews

Breaking

Friday, March 3, 2023

जयहिंद लोकसंचलित साधन केंद्र लातूर पूर्व द्वारा नवतेजस्विनी दूध संकलन केंद्राचे , कातपूर येथे उदघाटन




 आज रोजी मौजे कातपूर येथे महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम ) पशुसंवर्धन विभाग व मदर डेअरी यांचे संयुक्त विद्यमाने नवतेजस्वीनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प व विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पांतर्गत जयहिंद लोकसंचलित साधन केंद्र लातूर पूर्व द्वारा नवतेजस्विनी दूध संकलन केंद्राचे , कातपूर येथे मान्यवरांच्या शुभ हस्ते सकाळी 10.00 वाजता उदघाटन करण्यात आले. यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी मा. श्री एम. एस. पटेल सर, मदर डेअरीचे जिल्हा समन्वयक धीर सिंग सर, अहमदपूर मदर डेअरीचे सुमित सिंग सर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. खडबडे डी. एस. सर, कातपूर गावच्या सरपंच श्रीमती रेणुका तुकाराम आयतनबोयने, उपसरपंच श्री मनोज भैया देशमुख, व्यवस्थापक सौ. सविता पाटील मॅडम व दूध संकलन केंद्राच्या अध्यक्ष जेजेवंता शहाजी देशमुख ,गावातील इतर शेतकरी व गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. पटेल सर जिल्हा समन्वय अधिकारी, (माविम ) यांनी केले. डेअरीबद्दल मा. धीर सिंग सर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापक सविता पाटील मॅडम यांनी केले. यावेळी सहयोगिनी मीरा कांबळे मॅडम सल्लागार पद्माकर केदासे सर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजन व नियोजन केले.










No comments:

Post a Comment