कोल्हापूरी बांध मजबुती करणं कामाची गुणवत्तेची चौकशी करा ...
कोल्हापूरी बांध मजबुती करणं कामाची गुणवत्तेची चौकशी करा ...
---
माहिती दर्शक फलक न लावताच मार्च एंड पूर्वीच बिल काढण्याची ठेकेदाराची लगीण घाई ...
----------------------------------
सोयगाव प्रतिनिधी
मुश्ताक शाह
°°°°°°°°°°°°°
डाभा ता.सोयगाव येथिल लोक कल्याणकारी कोल्हापूर बांधाचे शासकीय योजनेत सुरु असलेल्या कामात निकृष्ट वाळूसह दर्जाहीन सिमेंट, माती मिश्रीत मुरुम, दगडधोंड्याचा सर्रास वापर ... कामाची माहीती सर्वसामान्यांना होण्यासाठी व्हावी म्हणून लावण्यात येनारा फलक संबंधित एजन्सीने न लावताच , कामावर प्रशासकिय अधिकाऱ्याच्या गैरहजरीत कामाचा जोरदार सपाटा लावून मार्च एंडीग पुर्वीच कामाची एमबीए तयार करुन शासनाच्या योजनेतून लाख्खो रूपयांचा हरताळीका पुसत मोठा अपहार करून आपली अधिक नफेखोरी करत असल्याचा आरोप होत असून अधिक दर्जेदार काम व्हावें म्हणून परिसरात सर्वसामान्यांची मागणी.
- डाभा ता.सोयगाव जि.संभाजीनगर या
सावळदबारा सर्कल मध्ये महीण्याभरपुर्वी सावळदबारा येथुन उगमस्थान असलेली कांग नदी पात्रात एक मोठा कोल्हापूर बांधकाम हाती घेण्यात आले आहे. ह्या बांधामुळे शेजारील जामनेर तालुका जि.जळगाव जोडल्या जाणार आहे, परिसरातील १८ गावांना याचा भविष्यात फायदा होणार आहे मात्र बांधाऱ्याचे काम सुरू झाल्यापासून आजतागायत प्रशासनाचा एकही अभियंता,उप अभियंता अधिकारी कामाचा दर्जा पाहण्यासाठी आलेले नाही.कामाच्या एकुण २० % टक्के रक्कम घेऊन कनिष्ठ अभियंता आणि वरिष्ठ अधिकारी रात्री अपरात्री कामाचे मोजमाप करतात असा आरोप होत आहे, संबंधित ठेकेदाराने मर्जीतील मजूराकर्वी लगबगीने बांधाचे काम हाती घेतले असून यात निकृष्ट दर्जाची माती मिश्रीत वाळू,माती मिश्रीत मुरुम, निकृष्ट दर्जाहीन सिमेंट,दगडधोंड्याचा सर्रास वापर करुन कांक्रीटीकरण करित आहे.
गेल्या वर्षात या कोल्हापूरी बांध काम झाले होते.पुर्वी देखील निकृष्ट काम झाल्याने बांधास तडे गेल्याने नदी काठच्या पैलतीरावरील मनुष्यवस्ती हानी होवू नये म्हणून शासनाने लोख्खो रुपयांचा निधी देवून मजबूती व डागडूजीचे काम एका ठेकेदारास एजन्सी करवी दिले आहे. डोगर दऱ्या जवळ असलेल्याने खणाऱ्या पुराच्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात आहे,हा बांध खजून पडू शकतो परिसरात शेतकरी व जनसामान्यांचा विचार करूनच शासनाने निधी दिला आहे. काॅलेटी कंट्रोल कडून कामाच्या गुनवत्तेची चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात यावी बांधाचे काम चांगले व दर्जेदार व्हावे अशी मागणी करण्यात येत आहे.
No comments