Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    औसा-निलंगा मार्गावर भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघे जागीच ठार

    औसा-निलंगा मार्गावर भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघे जागीच ठार


    किल्लारी : नातेवाईकांच्या परिवारातील मुलाचे पुणे येथे लग्न समारंभ संपन्न करून गावी परतत असताना सकाळी लातूर गुलबर्गा राष्ट्रीय महामार्गावर चलबुर्गा पाटी ( ता. औसा जिल्हा लातूर ) जवळ अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन पुलाखाली पलटी होऊन पडले आहे.

    निलंगा (जिल्हा लातूर) येथील नातेवाईकांच्या मुलाचे पुण्याला लग्न समारंभ आटोपून निघालेले नातेवाईक लामजण्यापासून जवळच असलेल्या चलबुर्गा पाटी येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एम एच 24 ए एफ 7050 हे वाहन पुलाखाली पलटी झाले.

    यात अंश किरण बडुरकर ( वय 10 ), जय सचिन बडुरकर, अमर सचिन बडुरकर ( वय 15) , आणि प्रकाश कांबळे ( 27 ), यांचा जागीच मृत्यू झाला. तर जान्हवी सचिन बडुरकर, यश किरण बडुरकर, गोदावरी सचिन बडुरकर, सचिन दिगंबर बडुरकर हे जखमी झाले असून त्यांना औसा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.

    अपघातात गोदावरी सचिन बडुरकर आणि जान्हवी सचिन बडुरकर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad