सोयगाव पोलीस ठाण्याच्या व्हॅनचा अपघात ...!
पोलीस निरीक्षक गंभीर तर एक पोलिस कर्मचारी जखमी...!
सोयगाव पोलीस ठाण्याच्या व्हॅनचा अपघात ...!
पोलीस निरीक्षक गंभीर तर एक पोलिस कर्मचारी जखमी...!
--------------------------------------------------
सोयगाव/प्रतिनिधि मुश्ताक शाह
°°°°°°°°°°°
फर्दापूर ता.सोयगाव पोलीस ठाणे अंतर्गत असलेले ली जगप्रसिद्ध अजिंठा लेणी बंदोबस्त कामी जात असलेल्या पोलीस व्हॅन चा (ता.५) रविवारी अपघात झाल्याने यात पोलीस निरीक्षकासह एक पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती हाती आली आहे.
या बाबत अधिक वृत्त असे की, फर्दापुर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भरत मोरे हे रजेवर असल्याने त्यांच्या त्यांचा अतिरिक्त प्रभार सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनमोल केदार दिलेला होता, यामुळे त्यांना अजिंठा लेणी बंदोबस्त कामी जावे लागते..रविवारी पोलीस व्हॅन क्र.एम. एच.२० / ६८९७ सहाय्याने सोयगाव कडून फर्दापुरकडे मार्गस्थ झाले असतांना फर्दापुर गावाच्या परिसरात बारा ते साडेबारा दरम्यान व्हॅनचे अचानक एका पाठोपाठ एक दोन्ही टायर फुटल्यामुळे व्हॅनने तीनवेळ पल्टी होऊन एका शेतातील जाळ्यात फेकल्या गेली या घटनेत पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांना हाताला आणि मेंदूला लागुन गंभीर दुखापत झाली आहे, पोलीस शिपाई रविंद्र तायडे यांना सुध्दा यात गंभीर मार लागला आहे . पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांना छत्रपती संभाजीनगर खाजगी रुग्णालयात आणि रवी तायडे यांना सोयगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.या प्रकरणी फर्दापूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
टायर फुटातच व्हॅन चेंडू सारखी हवेत...!
सोयगाव पोलीस ठाण्याच्या व्हॅन चे दोन्ही टायर फुटून व्हॅन आधी हवेत उंच उडाली त्यानंतर तीनवेळा पलटी होऊन अखेर एका शेतातल जाळ्यात व्हॅन अडकली. व्हॅन हवेत उंच उडताच पोलीस निरीक्षक अनमोल केदार पोलीस शिपाई रवी तायडे हे दोन्हीही फेकल्या गेले घटनास्थळी फर्दापुर,सोयगाव पोलिसांनी तातडीने धाव घेत गंभीर जखमींना उपचारासाठी दाखल केले.
No comments:
Post a Comment