डॉक्टर महिलेला दिले गुंगीचे इंजेक्शन अन् केले भयानक...
बीड: व्यसनमुक्ती केंद्रातील संचालकाने शरीर सुखाची मागणी करून मनोरुग्ण ठरवण्याचा तसेच वेश्या व्यवसाय करण्यास सांगितल्याचा आरोप केंद्रातील महिला डॉक्टरने केला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा येथील व्यसनमुक्ती केंद्रात काम करणाऱ्या महिला डॉक्टरकडे शरीर सुखाची मागणी केल्या प्रकरणी नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका अंजली पाटील, संचालक राजकुमार सोपान गवळे आणि ओम डोलारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी पिडीतने सांगितलेल्या माहितीनुसार अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, माझी निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून नवजीवन व्यसनमुक्ती केंद्र (वाघाळा तालुका अंबाजोगाई) येथे नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्तीनंतर माझ्यासोबत त्या ठिकाणी काम करणारे अंजली पाटील, राजकुमार गवळी, ओम डोलारे असे तिघेजण होते. या ठिकाणी सलग तीन महिने काम करून देखील मला कोणतही वेतन देण्यात आलं नाही. मात्र त्या उलट राजकुमार गवळी यांनी माझ्याकडे एक दिवस शरीर सुखाची मागणी केली.
यावर मी विरोध केल्यानंतर त्यांनी चक्क मला गुंगीचे इंजेक्शन दिले आणि त्याच ठिकाणी दाबून ठेवलं. इतक नाही तर माझ्या घरच्यांना मी मनोरुग्ण आहे, असे सांगितले गेले. यावरून माझ्या घरच्यांनी काही ना काही सांगून माझ्यावर औषध प्रयोग करून अतोनात त्रास दिला गेला. यातून कशीबशी मी त्या ठिकाणाहून माझी सुटका करत असताना, मला त्या व्यसनमुक्ती केंद्रावरील अनेक प्रकार पाहायला मिळाले, असे पिडीत महिलेने म्हटले आहे.
या तक्रारीवर काही केल्या पोलीस प्रशासन कारवाई करत नव्हते. आता मात्र तिघांवर कारवाई केली आहे. पिडीतेच्या तक्रारीवरून अंजली बाबुराव पाटील, राजकुमार सोपान गवळी आणि अन्य एकवर कलम ३५४, ५०४, ५०६, ३४ नुसार अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता यापुढे पोलीस प्रशासन कशा पद्धतीने ही कारवाई करत हे देखील पाहणे गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment