लातूर नागरी सुरक्षा व स्मारक संरक्षणार्थ, राष्ट्रीय महामार्ग क्र.३६१ शहराबाहेरुन बाह्यवळण मार्गे काढावा !* - latursaptrangnews

Breaking

Monday, April 24, 2023

लातूर नागरी सुरक्षा व स्मारक संरक्षणार्थ, राष्ट्रीय महामार्ग क्र.३६१ शहराबाहेरुन बाह्यवळण मार्गे काढावा !*



 लातूर नागरी सुरक्षा व स्मारक संरक्षणार्थ, राष्ट्रीय महामार्ग क्र.३६१  शहराबाहेरुन बाह्यवळण मार्गे काढावा !*

 
 *नागरी हक्क सुरक्षा व स्मारक संरक्षण समिती लातूर* ची मागणी

लातूर, दि.२४ शहरातील विविध सामाजिक संघटना व विविध राजकीय पक्ष, प्रतिष्ठान, सुजान दक्ष जागरूक नागरिक, विद्यार्थी पालक शिक्षक, वकील डॅाक्टर इंजिनिअर, पत्रकार व्यापारी, समाजसेवक, लोकप्रतिनिधी इत्यादींच्या वतीने सोमवार दि. २४ एप्रिल रोजी मा. जिल्हाधिकारी लातूर ( निवासी उप जिल्हाधिकारी मा. विजयकुमार ढगे ) यांना निवेदन देऊन कृती समितीने निवेदनात म्हटले आहे की,  दिवसेंदिवस  वाढत चालेल्या लातूरमधील नागरिकांच्या जिवीताच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय महामार्ग शहराबाहेरुन काढावा, या मागणीसाठी नागरी कृती समिती व स्मारक संरक्षण समितीच्यावतीने केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना साकडे घालण्यात येणार असून, मा. आयुक्त लातूर महानगरपालिका व मा. प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, नांदेड यांनाही या निवेदनाची प्रत माहितीस्तव व योग्यत्या कार्यवाहीस्तव दिली आहे.

समितीच्या वतीने दिलेल्या निवेदनात नमूद विशेष बाब अशी की, लातूर शहरातून जाणारा रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग एनएच ३६१ चे काम युध्द पातळीवर सुरु आहे. लातूर शहराच्या जवळ हा महामार्ग आल्यानंतर रस्ता रुंदीकरणासाठी जमीन संपादित न करता पूर्वीपासूनच अस्तित्वात असलेल्या राज्यमार्गानेच रिंगरोड चे रुपांतर राष्ट्रीय महामार्गात होत आहे. शहरातील रहदारी, वाहतूक, गर्दी, वर्दळ , प्रदूषण , अपघात या सर्व बाबींचा विचार करता रस्ता रुंदीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया, तसेच उड्डाण पूल हे सर्व पर्याय बाजूला ठेवून होत असलेले राष्ट्रीय महामार्गाचे काम हे नियमानुसार नसून ते लातूरकरांच्या जिवितासाठी धोकादायक ठरले आहे.
छत्रपती चौकापासून ते गरुड चौकापर्यंत असलेल्या  या मार्गावर विविध शैक्षणिक संस्था, शाळा महाविद्यालये, बाजार समिती, सॉ मील, कडबा व जनावरांचा बाजार आहे. तसेच या सध्याच्या मार्गांवर जवळपास ११ पेक्षा जास्त चौक आहेत जसे की छत्रपती चौक, राजीव गांधी चौक, वसंतराव नाईक चौक, विठाई चौक, कन्हेरी चौक, मानकरी चौक, महात्मा बसवेश्वर चौक, मल्हार चौक, सिकंदरपूर चौक, गंगाधाम चौक, लकी मार्केट चौक, बाभळगाव नाका चौक, सारोळा चौक, गरूड चौक इत्यादी. याच मार्गाला बाहेर गावांहून जवळपास २० रस्ते जोडतात तर शहरगावभागातून जवळपास २२ रस्ते येऊन मिळतात. शहरातील १९ पैकी ५ वार्ड प्रभाग हे या सध्याच्या रस्त्याच्या दक्षिण बाजूस आहेत त्यात शहराची २०% वस्ती लोकसंख्या आहे. तसेच या रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड प्रमाणात वाढलेली वस्ती, वसाहत, शहरीकरण, प्रदूषण, अपघात, वाहतूक ट्राफिक जॅम , रोड अपघात मृत्यूची वाढती संख्या या सर्व बाबींचा विचार करता, हा राष्ट्रीय महामार्ग लातूर शहराच्या बाहेरून बाह्यवळण, बायपास रोड नियोजित प्रयोजित नविन रिंग रोड पेठ, चांडेश्वर, कव्हा, बाभळगाव, सोनवती, भातखेडा मार्गे भूसंपादन झालेल्या भागातून जावा अशी आग्रही मागणी विविध सामाजिक संघटना व विविध राजकीय पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. या निवेदनावर शहरातील जवळपास ५० संघटना व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांच्या सह्या आहेत. महाराष्ट्रातील कोणत्याही शहरातून राष्ट्रीय महामार्ग जात नसताना लातूर शहरातून असा महामार्ग घालण्याचा घाट प्रशासकीय यंत्रणेने घालू नये. शहरातील व्यापारी, विद्यार्थी नागरीक रूग्ण , शेजारील शेतकरी व तसेच बाजारपेठ , वाहतूक, अपघात, प्रदूषण, जिवित व वित्त हाणी इत्यादीचा विचार करून या मार्गा ऐवजी नविन मार्ग तयार करून न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. लातूरकरांच्या जिवितांच्या संरक्षणासाठी या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी सोमवार, दि.२४ एप्रिल २०२३ रोजी सर्व पक्ष, संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. सदरील निवेदन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना देण्यात येणार असून, या मार्गावरील असलेल्या महापुरुषांची स्मारके स्थलांतरीत केले जावू नयेत व ती संरक्षित करावीत. अन्यथा शहरातील नागरिकांत भावनिक, धार्मिक मुद्दा उपस्थित झालेलाच आहे. त्यातून सामाजिक सलोखा राहणार नाही व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल यास संबंधित प्रशासन जबाबदार राहील. असाही इशारा निव्दनाद्वारे समितीने दिलेला आहे. हा राष्ट्रीय महामार्ग शहराच्या बाहेरुन काढावा  या विषयांबाबत प्रशासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन  करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

समितीच्या वतीने मा. जिल्हाधिकारी यांना भेटायला गेलेल्या शिष्टमंडळात श्री. बसवंतअप्पा भरडे, माजी नगरसेवक श्री. अशोक गोविंदपूरकर, प्रा. संगमेश्वर पानगावे, लक्ष्मण वंगे, ड. निलेश करमुडी, चंद्रशेखर कत्ते, विश्वनाथ खोबरे, विवेकानंद चामले, इंजि. विजयकुमार शेटे, सौ. लताताई मुद्दे, कावेरी विभूते, सिकंदर पटेल, अजय सुरवसे, मनोज राघो, त्र्यंबक स्वामी, विक्रांत शंके, आकाश मोठेराव, शिवलिंग गुजर, प्रा. प्रविण शेटे, अजित फुलारी, आर डी काळे, सचिन फत्तेपुरे, शिवहार बिरादार वाडकर, वियकुमार कुडूंबले, अजय सुर्यवंशी, वामन अंकुश, दयानंद काळशेट्टे, सदाशिव हासनाबादे, बालाजी कामजोळगे, इत्यादी उपस्थित होते.
तर या निवेदनावर ड. उदय गवारे, प्रा. सुदर्शन बिरादार, बसवंतअप्पा उबाळे, ड. गोविंद सिरसाट, ड. सुरज विभूते, ड. किशोर राजूरे, प्रा. संजय पवार, वीरसेन उटगे, ऍड. शिवाजी मदने, सुशिल चौव्हान, विकास सुर्यवंशी, ड. जीवन कसबे, प्रकाश कोरे, प्रा. दत्तात्रय मुंडे, ड. आर व्ही सिध्देश्वरे, बोळेगावे एम डी, एस एस नाईकवाडी, जी के चरकपल्ले, ड रब्बानी बागवान, ड शिवशंकर भुजबळे, ड सचिन बावगे, स्वामी टी जी, शिवराज नावंदे गुरूजी, शरद झरे, राम रोडगे, केदार इटगे, अंतेश्वर कुदरपाके, मंगल बिराजदार , केशव घंटे, रणधीर सुरवसे, जगन्नाथ येंचेवाड, श्रीकांत उपासे, जगन्नाथ कोळंबे, प्रा. गोविंद पांढरे, प्रा. श्रीनंद पाटील, प्रा. शिवशरण हावळे, डॅा संतोष स्वामी, इंजि. शिवलिंग चौधरी, संजय गिरी, सुरेश येरूळे, रमेश राठोड, ड अंगदराव गायकवाड, बसवराज बाळे, दिपक कांबळे, रफिक तांबोळी, बसवेश्वर रेकूळगे, दत्ता भुरे, ड एल आर शेख, अफसर कारभारी, प्रा. श्रीकांत माळी, दिपक बजाज, शैलेश कानडे, अनिल उस्तुर्गे, विनायक लोमटे, शिवानंद पाटील, राहूल जवळे, आदर्श उपाध्ये, किशोर राजमाने, शिवाजी सुर्यवंशी, लिंगेश्वर बिरादार, विश्वास काळे, अहमद शेख, सचिन मुळे, रमेशअप्पा वेरूळे, बलराज खंडोमलके, कोरके सर, रवी सावळगी, वैजनाथ जट्टे, राजकुमार बिडवे, दत्ता खंकरे, अशोक नाईकवाडे, रामेश्वर कदम, रवी बिराजदार, विरेश कोरे, रवी कोरे, इत्यादींच्या सह्या आहेत.
या समितीत शेतकरी कामगार पक्ष, महाराष्ट्र विकास आघाडी, वीरशैव समाज लातूर, लिंगायत महासंघ, लिंगायत एकीकरण समिती, बौध्द बसव शाहू फुले आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते, रुग्ण हक्क संरक्षण समिती, जागर समता, संभाजी ब्रिगेड , बसव सेना, राष्ट्रवादी कॅांग्रेस, अनुभव मंटप, किसान मोर्चा, जंगम समाज संघटना, आम आदमी पार्टी, महिला मंडळ प्रतिनिधी, शिक्षकमित्र, रयत प्रतिष्ठान, पत्रकार, राष्ट्रीय लिंगायत मोर्चा, लिंगायत सेवा संघ, मनसे, शिवा संघटना, लोकप्रहार संघटना, शिक्षण सम्राट, मुस्लिम क्रांती सेना, भारतीय राष्ट्रीय कॅांग्रेसचे, गोरक्षण गोरक्षक, लहुजी योध्दा संघटना, कपिलधारेश्‍वर प्रतिष्ठान, लिंगायत संघ, युवा गर्जना संघटना, संपादक, लिंगायत व्यापारी संघाचे प्रमुख पदाधिकारी नेते कार्यकर्ते आदिंचा समावेश होता. असे आमचे प्रतिनिधी यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment