आरोग्यमंत्र्यांच्या मतदार संघातील ग्रामीण रुग्णालयात तोडफोड; डॉक्टर, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ - latursaptrangnews

Breaking

Tuesday, April 25, 2023

आरोग्यमंत्र्यांच्या मतदार संघातील ग्रामीण रुग्णालयात तोडफोड; डॉक्टर, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ

 




आरोग्यमंत्र्यांच्या मतदार संघातील ग्रामीण रुग्णालयात तोडफोड; डॉक्टर, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ


धाराशिव : आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या मतदार संघातील भूम ग्रामीण रुग्णालयाची गुरुवारी रात्री अज्ञात व्यक्तीने तोडफोड केली . या बरोबरच कर्तव्यावर उपस्थित असणारे डॉक्टर व कर्मचाऱ्यांना देखील शिवीगाळ करण्यात आल्याचे समजतंय. एवढा राडा झाला असताना संबधित व्यक्तींच्या विरोधात अदयाप गुन्हा दाखल झाले नाही. यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

भूम शहरातील एका रुग्णाला उपचारासाठी गुरुवारी रात्री भूम ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. किरकोळ कारणावरुन रुग्णाच्या नातलगाने ड्युटीवर असणारे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर होनमाने, ब्रदर खैरे, सफाई कर्मचारी कांबळे यांच्याशी हुज्जत घालून त्यांना शिवीगाळ करून दवाखान्यातील सर्व औषधे अक्षरश: जमिनीवर फेकून दिली. तसेच तिथल्या खुर्च्याची व कचरा ठेवणाऱ्या डस्टबिनची पण तोडफोड करण्यात आली.

पोलिसांना साधी कल्पनाही देण्यात आली नाही

या हल्ल्यात समोरून असलेल्या केबिनची काच फोडून टाकण्यात आली. ड्युटीवर असणारे ब्रदर खैरे यांना पण शिवीगाळ करण्यात आली. हा सर्व प्रकार ग्रामीण रुग्णालयात सुरू असताना पोलिसांना साधी कल्पनाही देण्यात आलेली नाही. हा सर्व प्रकार घडल्यानंतर या प्रकाराचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. त्यात स्पष्टपणे तोडफोड केल्याचे दिसत आहे.

संबंधित प्रकाराचे व्हिडिओ जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गलांडे यांना पाठविण्यात आलेले होते. तरीही यावर काहीच कारवाई झालेली अद्यापही दिसत नाही.

No comments:

Post a Comment