प्रत्येकाने आर्थिक नियोजन करायलाच हवे - संदीप भुशेट्टी



 प्रत्येकाने आर्थिक नियोजन करायलाच हवे - संदीप भुशेट्टी

धाराशिव / उस्मानाबाद (प्रतिनिधी):- धाराशिवकर आपण आर्थिक नियोजन कसे कराल? या आर्थिक नियोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन विचार वाहिनी आणि दिशा पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात होते, शिबिरात प्रत्येकाने आर्थिक नियोजन करायलाच हवे..! असे प्रतिपादन मुख्य वक्ते तथा चतुर इन्व्हेस्टमेंटचे सीईओ संदीप भुशेट्टी यांनी केले.
कोणत्या प्रॉडक्ट मध्ये पैसे गुंतवल्यास जास्त चांगला परतावा मिळतो ते आय आय एफ एल म्युच्युअल फंडाचे राज्यप्रमुख भूषण दुसाने यांनी शिबिरात समाविष्ट झालेल्या श्रोत्यांना सांगितले. आर्थिक नियोजन किंवा पैशाने पैसे कसे कमवायचे हे कोणत्याही शाळेत किंवा कॉलेजमध्ये शिकवले जात नाही ते प्रशिक्षण अशाच आर्थिक नियोजनाच्या कार्यक्रमातून आपणास मिळते असे प्रास्ताविक करताना विचार वाहिनीचे संस्थापक अध्यक्ष तथा समृद्ध व्यापारचे संपादक यांनी विचार व्यक्त केले. सर्वांनी आर्थिक नियोजन कसे करावे ? का करावे ? कुठे करावे ? त्याच्या काय पद्धती आहेत? या नियोजनाचे फायदे काय आहेत ? तोटे काय आहेत? अश्या अनेक प्रश्नांवर या शिबिरात उहापोह झाला.
आभार प्रदर्शन करताना डॉ दापके म्हणाले की हे आर्थिक नियोजन शिबिर आयोजन करण्याची संधी विचार वाहिनी, चतुर इन्व्हेस्टमेंट आणि आयआयएफएल या संस्थेने दिशा पतसंस्थेला दिली त्यामुळे आज येथे उपस्थित असलेला प्रत्येक धाराशिवकर आर्थिक साक्षर होण्यास मदत झाली.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी निशांत परळकर, प्रसाद कुंभार, राजेंद्र कापसे, गजानन पाटील, संजय राजूळे, गंगाधर डिगोळे, विचार वाहिनी परिवार आणि दिशा पतसंस्था परिवार यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रय जी परळकर यांनी केले, आभार दिशा पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ दिग्गज दापके - देशमुख तर सूत्रसंचालन गंगाधर डिगोळे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post