मुंबई : राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे आधीच बळीराजा चिंतेत असताना आता एका चक्रीवादळामुळे राज्याला मोठा धोका असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबात पट्टा तयार झाल्यामुळे आज मोचा चक्रीवादळ धडकणार आहे. याचा परिणाम महाराष्ट्रासह अनेक राज्यांवर पाहायला मिळेल, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भासह नजिकच्या शहरांमध्येही पावसाचा जोर पाहायला मिळेल. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी आणि धान्याची योग्य ती विल्हेवाट लावावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, बंगालमधील चक्रीवादळाच्या प्रभावामुळे १० मेपर्यंत रोजी काही ठिकाणी ताशी ७०-८०किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ मे रोजी बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून याची तीव्रता ९ तारखेपर्यंत आणखी वाढण्याची शक्यता आहे. नंतर हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात पुढे उत्तरेकडे प्रवास करेल. यामुळे अंदमान निकोबारला ८-१२ मेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. इतकंच नाहीतर या दरम्यान, मच्छिमारांनाही समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Tags
महाराष्ट्र