"शासकीय महसूल कर्मचारी गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी श्री. अन्सार सैदानी यांची फेरनिवड" .
लातूर, दि. 04 : धाराशिव - लातूर जिल्ह्यातील शासकीय महसूल कर्मचारी गृहनिर्माण सहकारी संस्था ही येथील शासकीय महसूल कर्मचाऱ्यांसाठी सुव्यवस्थित गृहनिर्माण करण्याचे काम गेली अनेक वर्षांपासून करत आहे .
या सहकारी गृहनिर्माण संस्थेची सभासदाची निवडणूक पंचवार्षिक पद्धतीने केली जाते , निवडलेल्या सभासदा मधून एकाची चेअरमन म्हणून निवड केली जाते , याच शासकीय महसूल कर्मचारी गृहनिर्माण सहकारी संस्थेची निवडणूक गेल्या महिन्यात घेण्यात आली , यात 13 सभासद असून श्री. अन्सार सैदानी यांची पुनश्च एकदा सर्वानुमते चैरमन म्हणून निवड करण्यात आली .
मागील पंचवार्षिक मध्ये सुद्धा श्री. अन्सार सैदानी यांनी अनेक चांगली कामे येथे राबवली होती , सर्वांशी एकदिलाने राहणारे ,विधायक कार्य करणारे , मनमिळावू, सर्वांना सोबत घेवून चालणारे चैअरमन मिळाल्याने सर्व सभासद , कर्मचारी , श्री गणेश सरवदे नायब तहसीलदार आंबेजोगाई,श्रीहरी माने , नुरखा पठाण , श्री. दीपक राऊत , श्री . युवराज बुलबुले,श्री. बजरंग चव्हाण ,श्री. अक्षय जाधव यासह ,सर्व स्तरातून श्री अन्सार सैदानी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे .
Tags
लातूर