"उंट तिरका चालतो, पण घोड्याची चाल.." अजित पवारांच्या नाराजीवर संजय राऊतांची टिप्पणी !
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या २५व्या वर्धापनदिनी मोठी घोषणा केली. खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपद दिलं. तर पक्षातील इतर काही नेत्यांकडे जबाबदाऱ्यांचं वाटप केलं.
मात्र, या सर्व फेरबदलांमध्ये अजित पवारांकडे कोणतीही जबाबदारी सोपवण्यात आलेली नाही. यावरुन तर्कवितर्कांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. याचदरम्यान, ठाकरे गटानं अजित पवारांना डिवचलं आहे.
"उंट तिरका चालतो, पण घोड्याची चाल.."
अजित पवार यांना नव्या फेररचनेतून वगळले. त्यामुळे ते दिल्लीतील कार्यक्रमातून निघून गेले वगैरे नेहमीच्या कंड्या पिकविण्यात आल्या. अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातले ‘खिलाडी’ आहेत व राज्याच्या बाहेर पडून काम करण्याचा त्यांचा पिंड नाही. सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष करावे ही आपलीच सूचना होती असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
अजित पवार हे विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत व त्यांच्या नेतृत्वाखालचा गट हा भाजपच्या दगडावर पाय ठेवून आहे असे नेहमीच सांगितले जाते. अडीचेक वर्षांपूर्वी त्यांनी फडणवीस यांच्याबरोबर पहाटेचा शपथविधी केल्याचा हा परिणाम. अजित पवार हे भाजपच्या तंबूत जाऊन परत आले हा त्यांच्यावर ठपका आहे व हा ठपका कायमचा दूर करण्यासाठी अजित पवारांनाच शर्थ करावी लागेल.
No comments:
Post a Comment