मुरुडचं कणखर नेतृत्व म्हणजे... दिलीप नाडे "मुरूडच्या मातीतील अनमोल मोती "
मुरुडचं कणखर नेतृत्व म्हणजे... दिलीप नाडे
"मुरूडच्या मातीतील अनमोल मोती "
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांनी पक्षात बंडखोरी केली आहे,त्यामुळे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सभ्रमात आहेत. शरद पवार साहेबांच्या पाठीमागे जायचे की ? अजित पवारांच्या पाठीमागे जायचे ? याचा निर्णय ही आता मुरूडच्या राजकारणावर पडला आहे ,दिलीप नाडे काय भूमिका घेणार याकडे मात्र मुरुडकरांचे चांगलेच लक्ष लागले आहे.
दिलीपदादांचं असलेलं अष्टपैलू व्यक्तिमत्व गेल्या 40 वर्षापेक्षा अधिक वर्षापासून मुरुडच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक ,आर्थिक, शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात मोठे कार्य केलेलं आहे. या सर्वच क्षेत्रावर त्यांची जबरदस्त पकड असल्यामुळे मुरुडच नेतृत्व त्यांच्याकडे जातं. त्यांच्याकडे कोणत्याही क्षेत्रातल वक्तृत्व , नेतृत्व व कर्तुत्व करण्याची क्षमता आहे.
दिलीप नाडे जरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सदस्य असले तरी त्यांनी बऱ्याचदा पक्षाच्या विरोधात सुद्धा भूमिका घेतलेली आहे.गावाच्या हितासाठी कधी काँग्रेसला साथ तर कधी राष्ट्रवादीला लाथ तर कधी दोघानाही लाथ अशाही त्यांनी भूमिका घेतलेल्या आहेत. गावाच्या भल्यासाठी त्यांनी बऱ्याचदा स्वर्गीय माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे विकासाच्या योजना मांडून खेचून आणल्या तसेच गावच्या राजकारण म्हणजे कट शहाचे राजकारणावर त्याची मजबूत पकड आहे.
गावाचे एक मुख्य नेतृत्व म्हणजे दिलीप नाडे होय त्यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील पदाधिकारी ,कार्यकर्ते खंबीरपणे त्यांच्या पाठीशी असतात गावकरी ते रावकरी अशी मन त्यांना साजेशी वाटते. गावाचं राजकारणात आज जरी चढउतार आला असला तरी सर्वसामान्यांची सेवा करणे हा त्यांचा ध्यास आहे सत्ता असो वा नसो आढलेल्या नडलेल्याना मदत करणे हा त्यांचा स्वाभाविक गुण आहे.
स्पष्टवक्तेपणा त्यांच्या स्वभावाचे आणखी एक प्रमुख वैशिष्ट्ये आहे. काम घेऊन आलेल्या व्यक्तीचे काम होत असेल तर ते जागेवरच त्याच्या समोरच करणार , होत नसेल तर स्पष्ट होत नाही असं सांगण्यात त्यांना कधीही कमीपणा वाटत नाही.
प्रखर स्वाभिमानी बाणा त्यांच्या स्वभावाचे आणखी एक वैशिष्ट्य.राजकारणात नेत्याच्या पुढे - पुढे करून व लाचारी करून पद मिळवणारी अनेक कार्यकर्ते आपण पहिले आहेत.परंतु दादा त्यास अपवाद आहेत. त्यासाठी त्यांना आयुष्यभर अनेक लातूर उस्मानाबादच्या रथी - महारथीच्या विरोधात संघर्ष करावा लागला परंतु त्यांनी शेवटपर्यंत आपला स्वाभिमानी बाणा सोडला नाही. त्यांच्या या स्वाभिमानी बाण्यास मुरुडवासीयांनी नेहमीच प्रखर साथ दिलेली आहे .
गेल्या 30 ..35 वर्षापासून सोसायटी, ग्रामपंचायत ,पंचायत समिती, जिल्हा परिषद ,तेरणा साखर कारखाना व कृषी उत्पन्न बाजार समिती सत्तेत राहूनही भ्रष्टाचाराचा एकही कलंक त्यांच्यावर लागला नाही.
राजकारणात येण्यापूर्वी जेवढी जमीन जुमला त्यांच्या नावावर आहे.तेवढाच आजही आहे ,त्याच्यात कसलीही वाढ झालेली नाही.
नाडे यांच्याकडे योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची समयसूचकता आहे. त्यासाठी पडेल ती किंमत मोजण्याची त्यांची तयारी असते. मागील एका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मुरुडच्या बाजारी आठवडा मैदानावर दिलीप दादांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारात जाहीर सभा चालू होती.त्याचवेळी समोरच्या सार्वजनिक स्टेजवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब यांची जाहीर काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा होती.दादांची सभा सुरू होऊन फक्त दहा मिनिटे झाली होती ,त्यावेळेस समोरच्या सार्वजनिक स्टेजवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब यांचे आगमन झाले .
दादांची सभा चालू असल्यामुळे विलासराव देशमुख साहेब यांनी थोडा वेळ स्वतःची सभा थांबण्याचे ठरवले. दादाच्या सभेला चार ते पाच हजार मतदाराची गर्दी होती. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब आपल्या सभेमुळे थांबले आहेत हे जेव्हा त्यांना कळले त्यावेळेस त्यांनी आपली सभा जागेवरच दहा मिनिटात आटोपती घेतली. तेव्हा त्यांनी
समोर बसलेल्या सर्व मुरुडकरांना विलासराव देशमुख साहेब यांच्या सभेस उपस्थित राहण्यास सुचविले. त्यांची सभा शांततेत ऐकण्यासाठी सांगितले, साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत , ते आपल्या गावी आले आहेत , आपण त्यांचा आपल्या गावात सन्मान केलाच पाहिजे असे सांगितले. विलासराव देशमुख साहेबांची सभा झाली , परंतु दिलीपदादा यांचे राष्ट्रवादीचे तिन्ही उमेदवार जिल्हा परिषद व पंचायत समितीचे चे प्रचंड मतांनी निवडून आले .
मागील सहा महिन्याखाली झालेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात अमर बापूंचे निधन झाले .मुरुड शहरावर दुःखाचा डोंगर कोसळला. अशावेळी दादांनी स्वतःच्या पॅनलचा सरपंच पदाचा उमेदवाराची माघार घेऊन उमेदवारास जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे विद्यमान सरपंच प्रचंड मतांनी निवडून आले.या दोन्ही वेळी दाखवलेली समयसूचकता ही राजकारणात मुरलेल्या व्यक्तीला जमते.
दिलीपदादांनी त्यांच्या राजकीय वाटचालीत अनेक जणांना ग्रामपंचायतचे सरपंच, सोसायटीचे चेअरमन ,पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व कारखान्याचे संचालक केले. त्यांच्या प्रचारामुळे लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अनेकजण आमदार व खासदार झाले परंतु त्यांच्याकडून मुरुडच्या विकासाच्या योजनेशिवाय कशाचीही अपेक्षा केली नाही. नेहमी मुरुडच्या विकासाची कास व आस धरणारा हा स्वाभिमानी नेता आहे. म्हणून आम्हाला हा मुरूडच्या मातीतील अनमोल मोती वाटतो. सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण अतिशय गडूळ झालेल आहे .पक्षीय निष्ठा पेक्षा व्यक्तीनिष्ठेवर राजकारणाची दिशा चालू आहे. राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्षावर कुरघोडीकरून त्यांना संपवीत आहेत .अशा वेळेस मुरुडच्या विकासासाठी दिलीपदादा जी भूमिका घेतील त्या भूमिकेच्या मागे आपण सर्व मुरुडकर ठामपणे उभे राहू या. हीच अपेक्षा व्यक्त करतो
अशा या आमच्या नेत्यास वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा .आई तुळजाभवानी त्यांना उदंड आयुष्य देवो . ईश्वर त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करो.

No comments