Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    केंद्रीय आरोग्य मंत्री व आमदारांच्या गावात तोतिया डॉक्टरवर कारवाई!

     केंद्रीय आरोग्य मंत्री व आमदारांच्या गावात तोतिया डॉक्टरवर कारवाई! 


    चौकशी नंतर अभोणा पोलीसात गुन्हा दाखल.



     कळवण तालुक्यातील पश्चिम भाग हा आदिवासी बहुल असुन या परिसरातील आदिवासी बांधवांच्या अडाणीपणाचा फायदा मोठ्या प्रमाणात घेतला जातो. त्यांची  दिशाभूल   करून लुटमार देखील केली जाते. या भागात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे देखील केली जातात. अशाच प्रकारचे  केंद्रीय आरोग्य मंत्री  व आमदार  यांच्या दळवट गावात अवैध दवाखाना मांडून बसलेल्या तोतिया डॉक्टरावर काल रात्री कळवणचे बिडीओ व पोलिस प्रशासनाकडून संयुक्तरीत्या कारवाई करण्यात आली. रात्री उशीरा पर्यंत सदर डॉक्टरची झाडाझडती घेऊन त्याच्यावर अभोणा पोलीसात गुन्हा नोंदवण्यात आला.

          आदिवासी भागात अशा तोतिया डॉक्टरांनी खेडोपाड्यात आपली दुकाने मांडले आहेत. त्यांच्यावर देखील कारवाई होणे गरजेचे आहे. 

    तर काहींची डॉक्टरकीच डिग्रीही पूर्ण नाहीत अशा डॉक्टरांची सखोल चौकशी करणे मात्र गरजेचे आहे तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणात मेडिकल आहेत मात्र डिग्रीवाले  कुठे तर डिग्री नसलेलेच मेडिकल चालवतात अशीही चर्चा आता तालुक्यात रंगू लागली आहे मात्र यामुळे एका चुकीने निष्पाप व्यक्तीचे अतोनात जीवही जाऊ शकतो हेही बघणे तितकेच महत्त्वाचे आहे अशा सर्वच बेजबाबदार 

    अपूर्ण वैद्यकीय ज्ञान असून देखील असे तोतिया डॉक्टर आदिवासी बांधवांच्या जीवाशी खेळतात त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होणे तेवढेच गरजेचे आहे अशी मागणी  आता तालुक्यातून जोर धरू लागली आहे.

          कळवण तालुक्यातील प्रतिष्ठित मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या दळवट गावात असा एखादा तोतिया डॉक्टर आपला बस्तान मांडून अनेक वर्ष बसतो आणि त्याची कोणीही काडीमात्र चौकशी करत नाही याला जबाबदार कोण? तसेच असे अवैध दवाखाने चालवणाऱ्या लोकांना कोण खतपाणी घालते, कुणाच्या भरवशावर ही लोक सर्वसामान्य जनतेच्या जिवाशी खेळतात असा देखील प्रश्न जनतेतून सध्या उपस्थित होत आहे. 

        एकंदरीत कळवण चे प्रांत  बीडीओ व पोलिस प्रशासनाच्या या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे मात्र चांलेच धाबे दणाणले आहेत तर सर्वसामान्यांकडून या कारवाईचा  सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे. 




    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad