स्त्री सन्मान व सुरक्षा काळाची गरज - प्रा.डॉ.शीतल अभंगे
स्त्री सन्मान व सुरक्षा काळाची गरज
- प्रा.डॉ.शीतल अभंगे
लातूर/प्रतिनिधी:आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात कार्यरत आहेत.असे असले तरी त्यांचा सन्मान व सुरक्षा ही काळाची गरज असल्याचे मत डॉ.शीतल अभंगे यांनी व्यक्त केले.
श्री केशवराज माध्यमिक विद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षा निमित्त आयाेजित विद्यार्थिनींच्या समुपदेशन कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या.स्त्री ही शक्तीचे रुप आहे.तिचा सन्मान व सुरक्षा व्हायला हवी,असे त्या म्हणाल्या.
प्रतिमा पूजन व सांघिक पद्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षिका श्रीमती अंजली निर्मळे यांच्यासह पोलीस निरीक्षक श्रीमती मनिषा लटपटे यांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.अभंगे म्हणाल्या की,स्त्री हे शक्तीचे रूप आहे.स्त्रिया ज्योती रूपाने घर प्रकाशित करतात.
त्यामुळेच त्यांचा सन्मान राखला पाहिजे.त्यांची सुरक्षा करणे आपली जबाबदारी आहे,असेही त्या म्हणाल्या.
मनोगत व्यक्त श्रीमती लटपटे म्हणाल्या की, प्रत्येक मुलीने उच्च शिक्षण घेऊन समाजकार्य करावे . ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्न करावेत असे सांगून त्यांनी स्वतःचे अनुभव विद्यार्थिनींना सांगितले.
अध्यक्षीय समारोपात पर्यवेक्षिका श्रीमती अंजली निर्मळे म्हणाल्या की,विद्यार्थिनींनी आपल्या आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी.पूर्णकन्या ते मातेपर्यंतचा प्रवास करण्यासाठी आपले आरोग्य महत्त्वाचे आहे.आपणच आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे,असे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास सातवी व आठवीच्या एकूण ४०० मुली उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अभ्यासपूरक मंडळ प्रमुख श्रीमती शैला सांगवीकर यांनी केले.प्रास्ताविक, परिचय व स्वागत श्रीमती तेजस्विनी सांजेकर यांनी तर उपस्थितांचे आभार कार्यक्रम प्रमुख श्रीमती रेणुका गिरी यांनी मानले. श्रीमती कांचन तोडकर यांच्या कल्याणमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी,विद्यासभा संयोजक तथा उप मुख्याध्यापक महेश कस्तुरे,पर्यवेक्षक संदीप देशमुख,बबन गायकवाड, दिलीपराव चव्हाण यांच्यासह सर्व महिला शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
No comments