विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
यांचा 29 व 30 सप्टेंबर रोजी लातूर जिल्हा दौरा
लातूर, दि. 27 (जिमाका) : विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे ह्या शनिवार, 29 व 30 सप्टेंबर, 2023 रोजी दोन दिवसांच्या लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचे शुक्रवार, 29 सप्टेंबर, 2023 रोजी रात्री 8. 30 वाजता लातूर येथे आगमन होईल.
विधानपरिषद उपसभापती श्रीमती डॉ. गोऱ्हे ह्या शनिवार, 30 सप्टेंबर, 2023 रोजी सकाळी 8.30 वाजता लातूर येथून किल्लारीकडे प्रयाण करती
उपसभापती श्रीमती डॉ. गोऱ्हे यांचे दुपारी 1.15 वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व राखीव. दुपारी 2.30 वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतील. दुपारी 3.30 वाजता लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लातूर व धाराशिव जिल्हाधिकारी यांच्या समवेत भूंकपाला 30 वर्षे आणि सद्यस्थिती याबाबत बैठक घेतील. दुपारी 4.45 वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथे सामाजिक संस्था यांच्या समवेत बैठक घेतील. सायंकाळी 5.45 वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना पदाधिकारी यांच्या समवेत बैठकीला उपस्थित राहतील. सायंकाळी 6.30 वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथून सोलापूरकडे प्रयाण करतील.