आ. विक्रम काळे यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान
उमेश खोसे व गंगाधर डिगोळे यांचा सामजिक उपक्रम.
लातूर : सोनानगर येथे राष्ट्रीय आदर्श शिक्षक उमेश खोसे व दैनिक अदिती एक्सप्रेसचे संपादक गंगाधर डिगोळे यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार सोहळा मराठवाडा विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती उमरगा शिवकुमार बिराजदार, प्रभाग क्रमांक 12चे माजी नगरसेवक देवाभाऊ साळुंके, काँग्रेस ओबीसी सेलचे शहराध्यक्ष जालिंदर बरडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव अंकुश नाडे, राष्ट्रवादी शिक्षक संस्थाचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गंगाधर आरडले, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ.अशोक मेटे, डायटचे निशिकांत मिरकले, सहशिक्षक बाबासाहेब भिसे, भगवान माध्यमिक विद्यालयाचे सहशिक्षक डॉ.धनराज जाधवर, जनता विद्यालय मुरुडचे सहशिक्षक दशरथ बरडे, आरपीएसएस चे संचालक रामदास माने, राजमाता जिजामाता संकुलाचे लिपिक शिवकांत वाडेकर, आदि प्रमुख पाहुणे उपस्थित होते
याप्रसंगी मराठवाडा विभागाचे शिक्षक आमदार आ. विक्रम बाप्पा काळे यांनी उपस्थित सत्कार मूर्तींना शुभेच्छा देत यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण आपल्या क्षेत्रात सामाजिक जाणीवेतून समाजभिमुख कार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
आ. विक्रम बप्पा काळे यांच्या हस्ते खालील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.
सत्कारमूर्ती
सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त डॉ. सतीश सातपुते व डॉ. संदीप जगदाळे, भाजपा युवा मोर्चाचे नूतन लातूर शहराध्यक्ष ॲड. गणेश गोमचाळे, शिवाजी विद्यालय बिटरगाव तालुका रेनापुर चे नूतन मुख्याध्यापक सूर्यकांत चव्हाण, जि.प.प्रा. शाळा सारोळा येथील सेवानिवृत्त शिक्षिका शिवमती रंजना चव्हाण, भाजपा प्रणित प्रभाग क्रमांक बारा,तेरा व चौदा चे स्वामी दयानंद सरस्वती मंडळ अध्यक्ष अमोल गीते, वाहतूक नियंत्रण कक्षाचे नूतन जमादार लक्ष्मण बिराजदार, जिल्हा परिषद प्रशाला नाईचाकुरचे सहशिक्षक राहुल बाबा, वसंतराव काळे माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे नूतन संचालक बी.एन.खोसे.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहशिक्षक प्रमोद टेकले, अमोल पेठे, राम पांचाळ, विष्णुदास आमदापुरे, शत्रुघ्न पंढारे, दत्तात्रेय सपकाळे, बळीराम चिंचकुटे, परमेश्वर माळी आदिने परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.देशपांडे यांनी केले तर प्रास्ताविक उमेश खोसे व आभार गंगाधर डिगोळे यांनी मानले.
No comments:
Post a Comment