PM Kisan Yojana : 15 वा हप्ता मिळण्यापूर्वीच या लाभार्थ्यांचे नाव यादीतून होईल गायब
PM Kisan Yojana : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेचा 15 वा हप्ता लवकरच मिळेल. पण यावेळी लाभार्थ्यांची संख्या कमी होणार आहे. अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. कारण तरी काय? कोण होणार या योजनेत अपात्र?
हे काम केले का?
14 वा हप्ता जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांना आता 15 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. आता एक वृत्त समोर येत आहे, त्यानुसार, देशातील अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याविषयीचे कारण पण स्पष्ट झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जमीन नोंदणी विषयीची माहिती, तपशील अद्ययावत न केल्याने अनेक शेतकऱ्यांना या योजनेतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. यापूर्वी पण शेतकऱ्यांना या कागदपत्रांची पूर्तता न केल्याने लाभ देण्यात आला नव्हता. ekyc न करणाऱ्या शेतकऱ्यांना केव्हाही यादीतून बाहेर करण्यात येऊ शकते.
यामुळे अडकू शकतो पैसा
तुम्ही पीएम किसान योजनेसाठी पात्र असेल तरी हप्ता मिळण्यात तुम्हाला पण अडचण येऊ शकते. तुम्ही जो अर्ज भरला आहे. तो भरताना जर चूक झाली असले तर अडचण येऊ शकते. लिंग, नाव, पत्ता आणि खाते क्रमांक यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक झाली असेल तर योजनेचा हप्ता थांबतो.
असे करा ई-केवायसी
जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर ई-केवायसी करणे आवश्यक आहे. ekyc न केल्यास तुमचा 15 वा हप्ता थांबविण्यात येईल. त्यासाठी तुम्हाला हे काम त्वरीत करावे लागेल. त्यासाठी पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर जाऊन ते अपडेट करावे लागेल. तसेच CSC केंद्रावर जाऊन ही माहिती अपडेट करता येईल. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास योजनेचा हप्ता जमा होणार नाही.
योजनेत किती मिळेत रक्कम
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत प्रत्येक वर्षी शेतकऱ्याला 6 हजार रुपये देण्यात येतात. ही रक्कम शेतकऱ्यांना शेतीसंबंधीच्या कामासाठी उपयोगी ठरते. त्याला बी-बियाणे खरेदी करताना, मशागतीसाठी ही रक्कम कामी येते. तीन टप्प्यात ही रक्कम देण्यात येते. प्रत्येक हप्त्यात चार महिन्यांचे अंतर असते.