ACB Traps Sports Officer : 1 लाख 10 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी जिल्हा क्रीडाधिकारी अटकेत - latursaptrangnews

Breaking

Wednesday, October 4, 2023

ACB Traps Sports Officer : 1 लाख 10 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी जिल्हा क्रीडाधिकारी अटकेत

 

ACB Traps Sports Officer : 1 लाख 10 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी जिल्हा क्रीडाधिकारी अटकेत





Kolhapur Sports News : कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे (kolhapur district sports officer chandrashekhar sakhare) याला 1 लाख 10 हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने अटक केली. एका ठेकेदाराच्या तक्रारीनंतर एसीबीने तक्रारीची पडताळणी करुन साखरेवर सापळा रचत कारवाई केली.

या कारवाईबाबत पोलीस उपअधिक्षक सरदार नाळे म्हणाले ॲल्युमिनियम कंपोझिट पॅनेलवरती प्रिंटशिप तयार करून देण्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून झालेल्या कामांची बिले काढण्यासाठी कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे याने 1 लाख 10 हजारांची लाच (bribe) मागितली होती. त्याबाबतची तक्रार एसीबी कार्यालयात ठेकेदाराने केली.

जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे यांला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी सायंकाळच्या सुमारास झाली. दरम्यान उच्चपदस्थ अधिकारी लाच घेताना सापडल्याने काेल्हापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

No comments:

Post a Comment