Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    झोपडीच्या अंधारात स्वप्नांच्या गर्भाचा मृत्यू युवक महोत्सव ‘ज्ञानतीर्थ २०२३’ श्रीराम लागू रंगमंचावर दुसऱ्या सत्रात ११ एकूण १६ एकांकिका कलाकारांनी सादर केल्या.



    झोपडीच्या अंधारात स्वप्नांच्या गर्भाचा मृत्यू युवक महोत्सव ‘ज्ञानतीर्थ २०२३’ श्रीराम लागू रंगमंचावर दुसऱ्या सत्रात ११ एकूण १६ एकांकिका कलाकारांनी सादर केल्या.

            लातूर: 13. व्यासपीठ क्रमांक दोन वर विविध महाविद्यालयातील कलाकारांनी सामाजिक संदेश देणाऱ्या एकांकिका सादर केल्या.आपल्या मनामध्ये भीती असेल तर आपण काहीच करू शकत नाही. आपल्याला जर काही सिद्ध करायचं असेल तर पहिल्यांदा मनातील भीती काढून टाकली पाहिजे. मानवाची वाटचाल यशस्वी जीवनाकडे व्हावी. ‘एका स्वप्न गर्भाचा मृत्यू' होऊ नये. कारण गरीबाची भूक लय वाईट असते. टाकलेला भाकरीचा तुकडा खाण्यासाठी कुत्र आणि माणसांमध्ये शर्यत लागते पण त्याच्यामध्ये कुत्राच जिंकतो. संताप नगर से आया हु वैताग नगर मे जाना है कधी संपणार हे दुःख आणि मानवी जीवनात कधी येणार आनंद? असे अनेक प्रश्न एकांकिका मधून सादर झाले. माणसाची झुंज निसर्गाशी की स्वतःशी? येणारी पिढी कशी झुंज देणार? जन्म बी मातीत मरण बी मातीत अंधारातील स्वप्न कधी पूर्ण होणार? आदिवासी घरामध्ये स्वप्नांचा सूर्य कधी उगवणार? सामाजिक अन्याय, अत्याचार गरीब माणूस खेड्यामध्ये झोपडपट्टीमध्ये, कुठेतरी पालं टाकुन किंवा फुटपाथवर जगतो त्याला थंडी, ऊन, वारा, पाऊस याची तमा नाही. आपल्या जीवनाचा ऱ्हाटगाडा असमानी सुल्तानी संकटाशी सामना करत जगतो आहे. त्याच्याकडे सामाजिक न्याय मागण्यासाठी ना शिक्षण आहे ना पदवी आहे आपले आयुष्याचे प्रश्न आणि दु:ख जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत झोपडीच्या निवाऱ्याखालीच सोडवण्याचा प्रयत्न करतो पण ते कधीच सूटत नाहीत. ते शिक्षणाने सूटु शकतात. पण शिक्षण हजारो कोस त्यांच्यापासून दूर आहे. असे प्रश्न विद्यार्थ्यांनी आपल्या एकांकिा मधून मांडले. त्याला रसिकांचा भरभरून भावनिक प्रतिसाद मिळाला.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad