रस्त्यावर अगरबत्ती, मोरांची पिसे अन् लिंबू, सैलानी बाबांच्या दर्शनावरून परतताना काय घडलं?

 छत्रपती संभाजीनगर : बुलढाणा येथील सैलानी बाबाचे दर्शन करून नाशिककडे परतत असणाऱ्या ट्रॅव्हल्स बसला भीषण अपघात झाला आहे. वैजापूर जवळील समृद्धी महामार्गावरील जांबरगाव टोलनाक्यावर उभ्या ट्रकला ट्रॅव्हल्स बसने जोराची धडक दिली. या अपघातात १२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यामध्ये चार महिन्यांच्या बाळाचा देखील समावेश आहे. तसंच अपघातात २३ प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वैजापूर आणि छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातातील सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी आणि इंदिरानगर येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.





हा अपघात एवढा भीषण होता की, हा अपघात पाहून उपस्थितांचे डोळे देखील पाणावले होते. अपघात झाला तेव्हा भाविक घेऊन गेलेल्या सर्व वस्तू अस्ताव्यस्थ पडलेल्या होत्या. अगरबत्ती, धूप, मोरांची पिसे, पसरलेली लिंबू अशा बऱ्याच प्रकारच्या वस्तू तिथे पडलेल्या होत्याबुलढाणा येथील बाबा सैलानी सर्वधर्म समभावाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई सैलानी येथील बाबा सैलानी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहेत. दरवर्षी तिथे होणारी नारळाची होळी आणि वर्षभर इथे बाबासाहेबांच्या दर्शनाकरता येणारे भाविकांची सर्वधर्म समभावाचे प्रतीक म्हणून ओळख आहे.

हजरत अब्दुर रहमान शाह सैलानी रहमतुल्ला अलैह १६ डिसेंबर १९०६ सैलानी बाबा म्हणून ओळखले जाणारे हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील नक्शबंदी प्रसिद्ध सुफी संत होते. त्यांची सुफी समाधी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात सैलानी बाबा दर्गा म्हणून प्रसिद्ध आहे. सैलानी बाबांचा जन्म एका श्रीमंत कुटुंबात झाला. त्यांचे वडील काले खान हे दिल्लीचे प्रसिद्ध व्यापारी होते. काले खान आणि त्यांची पत्नी अनेक वर्षे निपुत्रिक होते आणि एका सुफी संत मजझौब च्या आशीर्वादाने काले खानच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला. जे नंतर सैलानी बाबा म्हणून प्रसिद्ध झाले .

बालपणी आणि किशोरवयात त्यांना कुस्तीची प्रचंड आवड होती. त्यामुळे किशोरवयातच त्यांनी कुस्ती शिकण्यासाठी दिल्लीहून डेक्कनजवळच्या भागात स्थलांतर केले. बाळापूरचे प्रसिद्ध पैलवान नूर मियाँ यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यांनी कुस्तीमध्ये प्रभुत्व मिळवले. नंतर ते हैदराबादला गेले. एका सुफी फकीराच्या भेटीपासून त्यांचा सुफी प्रवास सुरू झाला, ज्याने त्यांना सूफी पंथ स्वीकारण्यासाठी प्रेरणा मिळाली .

हजरत नुरुद्दीन यांनी बाबांना बुलढाणा जिल्ह्यातील चिखली या छोट्याशा गावात जाण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यांच्या चमत्कारिक शक्ती आणि करिष्मामुळे, ते औलिया-ए-कामिल (उत्तम सुफी संत )म्हणून ओळखले जातात. त्यांचे शिष्य हजरत खैरुल्ला शाह मुजर्रद रहमतुल्ला अलैह यांनी सैलानी बाबांचे विविध चमत्कार "राज-ए-तसवुफ" या पुस्तकात नोंदवले आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post