अटल भूजल योजनेअंतर्गत शालेय स्पर्धांचे बक्षीस वितरण.....
अटल भूजल योजनेअंतर्गत शालेय स्पर्धांचे बक्षीस वितरण.....
लातूर तालुका प्रतिनिधी नवनाथ शिंदे: लातूर तालुक्यातील खुंटेफळ येथे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, लातूर व अंमलबजावणी भागीदारी संस्था भैरवनाथ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, बीड यांच्या वतीने अटल भूजल योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले.
अटल भूजल योजना विषयक जनजागृती व्हावी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी, यासाठी वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ.मेघा शिंदे, जिल्ह्याचे माहिती व शिक्षण संवाद तज्ञ सतिश माळी व जिल्हा समन्वयक कुलदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या रांगोळी, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा घेऊन मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक लिंबराज घोडके, प्रमुख पाहुणे म्हणून नवनाथ शिंदे चेअरमन बळीराजा अभिनव सहकारी संस्था खुंटेफळ गंगाराम कोळी,राम शिंदे, श्रीमंत शिंदे, गणेश शिंदे, अशोक शिंदे, सहशिक्षक खोसे, क्षमता बांधणी तज्ञ दत्ता सुरवसे, समुदाय संघटक सुनिल सोनकांबळे यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमामध्ये क्षमता बांधणी तज्ञ दत्ता सुरवसे यांनी अटल भूजल योजना विषयक सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन लिंबराज घोडके यांनी केले.
आभार प्रदर्शन सोमप्रकाश झीनेवाड यांनी केले.
या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
No comments