Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    २४ ऑक्टोबरपर्यंत आरक्षण मिळाले नाहीतर...; पुण्यातील जाहीर सभेपूर्वी जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

     


    २४ ऑक्टोबरपर्यंत आरक्षण मिळाले नाहीतर...; पुण्यातील जाहीर सभेपूर्वी जरांगे पाटलांचा सरकारला इशारा


    Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने पेट घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. महिन्याभरात अरक्षणावर निर्णय घेण्यात येईल, असे राज्य सरकारने अश्वासन दिल्यानंतर जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण सोडले. याचपार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांची आज पुण्यात जाहीर सभा होत आहे. या सभेपूर्वी जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. २४ ऑक्टोबरपर्यंत आरक्षण मिळाले नाहीतर, पुन्हा आंदोलनाला सुरुवात होईल, असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.

    जरांगे पाटील यांची आज पुण्यातील राजगुरूनगरमध्ये जाहीर सभा होत आहे. याआधी त्यांनी शिवनेरीवर शिवाई देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना जरांगे पाटील यांनी सरकारला त्यांच्या अश्वासनाची आठवण करून दिली. "येत्या २४ ऑक्टोबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. अन्यथा पुन्हा आंदोलनाला सुरुवात होईल. सरकारने आता समिती थांबवा. सरकारला कायदा पारित करण्यासाठी पुरावा हवा होता. त्यासाठी एक महिन्याचा वेळ मागितला होता. पुरावे सापडले नसते तर आम्ही आणखी काही दिवसांचा वेळ दिला असता. पण आता पुरावे सापडले असून सरकारने भावनिक न होता कायदा बनवावे, असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.

    पुढे जरांगे पाटील म्हणाले की, "सरकारला आता सुट्टी नाही. सरकारने कायदा पारित करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे. समितीला मुदतवाढ द्यायची गरजच नाही. ५ हजार कागदपत्र पुरेशी नाहीयेत का? दुसऱ्यांना आरक्षण देताना एकही कागद पाहिला नाही. आमचे ५ हजार कागद आहेत. त्या आधारावर तुम्हाला आरक्षण देता येईल. मग मुदतवाढ कशाला हवी आहे. आम्हाला या गोष्टी मान्य नाहीत. आम्हाला येत्या २४ ऑक्टोबरपर्यंत आरक्षण मिळाले पाहिजे. सरकारने विनाकारण मराठा समाजाच्या आरक्षणात अडथळा निर्माण करू नये."

    राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. दरम्यान मराठी समाजाला आरक्षण मिळावा म्हणून मुबंईतील एका तरुणाने आत्महत्या केली. तरुणाने घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे नव्या राजकीय वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. याशिवाय, मराठा संघटना शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आक्रमक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad