Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    राज्यातील बिअर विक्रीत घट; खप वाढवण्यासाठी सरकारने नेमला अभ्यास गट

     



    राज्यातील बिअर विक्रीत घट; खप वाढवण्यासाठी सरकारने नेमला अभ्यास गट


    Beer sale Decline in state : बिअर विक्रीत घट झाल्याने महसुल खात्याचे मोठे नुकसान होत आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी व बिअर विक्री वाढवण्यासाठी सरकारने एक अभ्यास गट नेमला आहे.

    राज्यात बिअर विक्रीत घट झाल्याने याचा थेट फटका राज्याच्या महसुलावर पडला आहे. बिअर विक्री वाढवण्यासाठी सरकारने एका अभ्यास गट गठित केला आहे. बिअर उद्योगाच्या माध्यमातून राज्याच्या महसूलात वाढ होण्याच्या दृष्टीने हा अभ्यास गट अध्ययन करून सरकारला अहवाल सादर करणार आहे. 

    बिअरवरील उत्पादन शुल्काची दरवाढ केल्यानंतर बिअरच्या विक्रीत घट होऊन बिअरच्या विक्रीचा आलेख आणि परिणामी मिळणारा शासन महसूल कमी होत आहे. त्यामुळे ही समिती नेमण्यात आली आहे. हा अभ्यासगट एक महिन्यात आपला अहवाल शासनास सादर करेल.

    विदेशी-देशी मद्य प्रकारामध्ये मद्यार्काचे प्रमाण बिअरपेक्षा जास्त असते. मद्यार्काच्या प्रमाणाच्या तुलनेत बिअरवरील उत्पादन शुल्काचा दर इतर मद्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे बिअरच्या  वाढीव किंमतीमुळे ग्राहक बिअर पिण्याकडे आकृष्ट होत नाही. अशा अडचणी बिअर उद्योगाच्या प्रतिनिधीने सरकारकडे मांडल्या होत्या. तसेच इतर राज्यांनी बिअरच्या उत्पादन शुल्काचा दर कमी केल्यानंतर त्या राज्यांना महसूलवाढीसाठी फायदा झाला असल्याचेही निवेदन केले आहे 

    बिअर विक्रीत घट झाल्याने महसुल खात्याचे मोठे नुकसान होत आहे.  हे नुकसान भरून काढण्यासाठी व बिअर विक्री वाढवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली हा अभ्यास गट नेमला आहे.  अभ्यासगटात पाच सदस्यांचा समावेश आहे.  यामध्ये अपर मुख्य सचिव ( राज्य उत्पादन शुल्क ) , गृह विभाग  राज्य उत्पादन शुल्क आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उप सचिव, ऑल इंडिया ब्रुवरीज असोसिएशनचे प्रतिनिधी, राज्य राज्य उत्पादन शुल्काचे अप्पर आयुक्त यांचा समावेश आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad