नांदगाव तालुक्यातील हिसवळ येथे भीषण अपघात



 नांदगाव तालुक्यातील हिसवळ येथे भीषण अपघात


मोटार सायकल व चार चाकीचा जोरदार धडकेत शिक्षक ठार


नांदगाव,माध्यमिक विद्यालय पांझणदेवचे उत्कृष्ट शिक्षक प्रशांत ठाकरे यांचे नांदगांव मनमाड रोडवर अपघाती निधन झाले.हि घटना दि.२९ सप्टेंबर 2023 रोजी सकाळी घडली.ठाकरे हे दुचाकीवरुन  मोटार सायकल क्रमांक mh 41 z  7672 क्रमांक हिने शाळेवर जात होते.याच वेळी विरूद्ध दिसेने येणारी चारचाकी कारने त्यांना जोरदार धडक मारली.त्यात ते गंभीर जखमी झाले.आणी त्यातच त्याचा मृत्यु झाला.या प्रसंगी चार चाकीतील चालक देखील गंभीर जखमी झाला असून त्यास उपचारास बाहेरगावी हलविण्यात आले आहे.अपघात दरम्यान चार चाकिकार रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली.या घटनेचा तपास नांदगांव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चव्हाण हे करीत आहे. 





Post a Comment

Previous Post Next Post