मनोज जरांगे पाटील यांची मांजरा पट्यात गाधवड येथे विराट सभा
मनोज जरांगे पाटील:-मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत आता माघार नाही
लातूर प्रतिनिधी नवनाथ शिंदे:-लातूर तालुक्यातील गाधवड येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची दुपारी 2 वाजता सभा आयोजित करण्यात आली होती.सभास्थळी जरांगे पाटील यांचे आगमन साडेपाच वाजता झाले.सकाळी अकरापासूनच मनोज जरांगे यांच्या सभेला जाण्यासाठी मांजरा पट्याच्या विविध मार्गांनी वाहनांची वर्दळ वाढली होती.पहिल्यांदाच मांजरा पट्यात सर्वात मोठी सभा झाली. सभेच्या ठिकाणी सभेच्या ठिकाणी यावेळी राजमुद्रा प्रतिष्ठान भिसे वाघोली या ग्रुपने ढोल ताशाचे आयोजन केले होते व तसेच मराठी क्रांती मोर्चा च्या सभेला जेवढी नागरिक आले तेवढ्या नागरिकांसाठी मोफत पाण्याची सोय उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानले अबाल वृद्ध,महिला,बालकांचा यात समावेश होता.दुपारी बारा ते साडेपाच पर्यंत मराठा समाज उन्हात जरांगे पाटील यांची वाट पाहत होता.दरम्यान मांजरा पट्यात गर्दीचे रेकॉर्ड मोडीत तुफान गर्दी झाली होती.मनोज जरांगे यांनी आपल्या भाषणात मार्गदर्शन करताना म्हणाले की जो पर्यंत महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र भेटत नाही तो पर्यंत आता माघार नाही. मराठा आरक्षण कसे मिळते.आतापर्यंत का मिळाले नाही.आरक्षण मिळवण्यासाठी काय प्रक्रिया करावी लागते.दरम्यान आरक्षणाची सर्वच माहिती या विराट सभेत सांगितली.सरकारने मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात कसे टिकेल यासाठी एक महिन्याच्या वेळ मागितला होता,त्यापेक्षा आपण 10 दिवस जास्त दिले आहेत.14 सप्टेंबरला एक महिना पूर्ण होतो.त्यामुळे त्याच दिवशी अंतरवाली सराटी येथे 150 एकर मैदानावर सभा घेण्यात येणार आहे.या सभेला आपण सर्वांनी एक मराठा स्वयंसेवक म्हणून शांततेत येण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.गाधवड येथील सभेत जमलेला जनसमुदाय बघून जरांगे पाटील म्हणाले की मला आता इथेच उपोषण करावे असे वाटते.जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण भेटा बांधणार नाही.माजलगाव ते अहमदपूर प्रवास दरम्यान खूप दमलो डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला होता.आपण सगळे माझ्यावर प्रेम करता त्यामुळे मला आणखी जास्त ऊर्जा मिळते.मार्गावरील गावात ठिकठिकाणी मराठा समाज स्वागताला येत आहे.त्यांना सोडून मी पुढे येऊ शकत नाही.म्हणून मला उशीर झाला.असे जरांगे पाटील आपल्या भाषणात म्हणाले