राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे जोरदार धक्के - latursaptrangnews

Breaking

Tuesday, October 3, 2023

राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे जोरदार धक्के

 


राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे जोरदार धक्के


नवी दिल्ली : देशाची राजधानी नवी दिल्ली आणि उत्तराखंडमध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत. आज दुपारी २ वाजून ५१ मिनिटांनी धक्के बसले होते. राजधानी नवी दिल्लीमध्ये जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळं जमीन हादरत होती. भूकंप होत असल्याचं समोर येताच लोकांनी घराबाहेर आणि कार्यालयाबाहेर धाव घेतली.


राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार दुपारी २.५१ मिनिटांनी झालेल्या भूकंपाची तीव्रता ६.२ रिश्टर स्केल इतकी होती. उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले. हा भूकंपाचा धक्का साधारणपणे १० सेकंद जाणवला.


नेपाळमध्ये देखील आज दुपारी २. २५ मिनिटांनी भूकंप झाला, अशी माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं दिली आहे. नेपाळमधील भूकंप हा ४.६ रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा होता.


सर्वसाधारणपणे ५.४ रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंप हा धोकादायक मानला जातो. राजधानी नवी दिल्लीसह या भूकंपाचे धक्के हरियाणा, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, पंजाब आणि राजस्थानमध्ये देखील जाणवला. या भूकंपाचं केंद्र नेपाळमध्ये असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.


भूकंपाचं केंद्र नेपाळमध्ये असल्या कारणानं भारतातील उत्तरेकडील राज्यांमध्ये देखील हे धक्के जाणवले. उत्तर प्रदेशच्या लखनऊ, कानपूर, श्रावस्ती, बरेली, मुरादाबाद, मेरठ आणि गाझियाबाद सारख्या शहरांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.नवी दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम आणि एनसीआरमध्ये भूकंपाच्या धक्क्यांमुळं लोकांमध्ये भीतीचं वातावरण दिसून आलं.

भूकंपशास्त्रासंदर्भातील जाणकार व्यक्तींनी याचं केंद्र नेपाळमध्ये असल्यानं दिल्ली एनसीआरमध्ये त्याची तीव्रता कमी प्रमाणात जाणवली. उंच इमारतींमध्ये भूकंपाची तीव्रता अधिक जाणवली. भूकंपाचे धक्के जाणवू लागताच लोक इमारतीमधून खाली उतरले. नवी दिल्लीतील देखील लोक घराबाहेर पडल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत.



.com/img/a/

एक कोटी रुपयांची खंडणी, ATMमधील कचऱ्याच्या डब्यात पैसे, पुढे असे घडले…

 October 02, 2023 0

 एक कोटी रुपयांची खंडणी, ATMमधील कचऱ्याच्या डब्यात पैसे, पुढे असे घडले… पुणे | 2 ऑक्टोंबर 2023 :  पुणे शहरातील पिंपरी चिंचवडमधील व्यावसायिका...



दरम्यान,दरम्यान, भूकंपाच्या तीव्रतेची मोजणी रिश्टर स्केलमध्ये केली जाते. रिक्टर मॅग्निट्यूड टेस्ट स्केल म्हटलं जातं. रिश्टर स्केल १ ते ९ दरम्यान मोजलं जातं. भूकंपाच्या केंद्राला एपीसेंटरद्वारे मोजलं जातं. काल देखील ईशान्य भारतासह उत्तर भारतात आणि पाकिस्तानात भूकंपाचे धक्के जाणवले होते.

No comments:

Post a Comment