लातूर प्रतिनिधी १९ आक्टोंबर २३ :
परभणी जिल्ह्यासह सोनपेठ तालुका तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनातआर्थिक बदल व्हावा यासाठी साखर उदयोग क्षेत्रात अदययावत तंत्रज्ञानाच्या
सहाय्याने सन २०२० मध्ये सुरू करण्यात आलेला देवीनगर सायखेडा येथील
टवेन्टिवन शुगर्स लि. युनिट २ च्या चौथ्या गळीत हंगामासाठी कारखाना सज्ज
झाला असून गुरुवार १९ ऑक्टोबर २०२३ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत विधीवत
पूजा करून ट्वेन्टी वन शुगर्स युनिट २ कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपन
करण्यात आले.
परभणी जिल्ह्यातील सायखेडा तालुक्यातल्या देवीनगर येथे सुरू करण्यात
आलेल्या टवेन्टिवन शुगर्स लि. युनिट २ चे यापूर्वी ३ गळीत हंगाम यशस्वी
ठरले आहेत. सन २०२३-२४ मध्ये होणाऱ्या चौथ्या गळीत हंगामासाठी कारखाना
व्यवस्थापनाकडून आवश्यक ती सर्व तयारी केली गेली असून ट्वेन्टी वन
शुगर्सची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
ट्वेन्टी शुगर्स लि.युनिट २ देवीनगर सायखेडाचा २०२३-२४ करिता गळीत हंगाम
लवकरच सुरू होत आहे. या अनुषंगाने गुरूवार दि १९ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी
कारखाना साईट, देवीनगर सायखेडा ता. सोनपेठ जि.परभणी या ठिकाणी गळीत
हंगाम २०२३-२४ बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ टवेन्टिवन शुगर्स लि.चे व्हा.
चेअरमन विजय देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकारी संचालक श्री.
सुभाष पाटील व सौ.मालन पाटील उभयताच्या हस्ते विधीवत पूजन करून संपन्न
झाले.
सोनपेठ तालुका तसेच परभणी जिल्हयासह नजीकच्या परीसरातील अतिरीक्त ऊसाचा
प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याकरीता राज्याचे माजी वैदयकीय शिक्षण व
सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्हयाचे माजी पालकमंत्री आमदार अमित
विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत कल्पकतेने साखर उदयोगातील
अदययावत तंत्रज्ञानाचा वापर करून टवेन्टिवन शुगर्स लि.युनीट २ ची २०२०
मध्ये सुरुवात करण्यात आली. सोनपेठ तालुक्यासह परभणी जिल्हयातील अधिकाधिक
ऊसाचे गाळप करणे या कारखान्यामूळे शक्य झाले. परभणी जिल्हा तसेच
परीसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यासाठी ट्वेन्टी वन शुगर्स युनिट २ देवीनगर
सायखेडा हा कारखाना अत्यंत फायदेशीर ठरला आहे. लवकरच सुरू होत असलेल्या
गळीत हंगामाकरिता कारखान्याची यंत्रणा सज्ज झाली असून त्यासाठी ट्वेन्टी
वन शुगर्सच्या युनिट २ च्या सर्व विभागानी जय्यत तयारी केली आहे. सर्व
सभासद व ऊस उत्पादकांच्या उसाचे वेळेवर गाळप करण्यासाठी पूर्ण नियोजन
करण्यात आले असून टवेन्टिवन शुगर्स लि.युनिट २ कडून हंगामात गाळप
झालेल्या उसाला चांगला ऊसदर देण्यात येणार असल्याचे व्यवस्थापनाकडून
सांगण्यात आले आहे. या प्रसंगी खातेप्रमुख व विभाग प्रमुख सर्वश्री
गोविंद देशमुख, श्री.रसाळ, श्री.निलेश माने, श्री.धर्मेंद्र गदाळे,श्री.
तुकाराम गडदे, श्री.अजित देशमुख,श्री.घुगे,श्री.जि.टी.मुंडे,श्री.विनोद
औटे,श्री.स्वप्नील कुंभार, श्री.आर.आर.जाधव,श्री.ज्ञानोबा शिरसाठ,
श्री.संजय साळुंके यांच्यासह ट्वेन्टी वन शुगर्सचे अधिकारी,
कर्मचारी,सभासद,ऊस उत्पादक शेतकरी व कामगार उपस्थित होते.
No comments:
Post a Comment