INCOME TAX RAID : अबू आझमी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर आयटीची छापेमारी
ईडी आणि आयकर विभागाने काल चार राज्यांमध्ये मोठी छापेमारी केली आहे. त्यात अबू आझमी यांच्याशी काही ठिकाणांचाही समावेश आहे. आझमी यांच्या बेनामी संपत्तीचा शोध घेण्यासाठी आयकर विभागाने तीन शहरांमध्ये छापेमारी केली आहे. मुंबई, वाराणासी आणि लखनऊ ही तीन ठिकाणे असल्याचं सांगितलं जात आहे.
160 कोटींच्या टॅक्स चोरीचा आरोप
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अबू आझमी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या देशबरातील एकूण 30 ठिकाणांवर आयकर विभागाने छापे मारले होते. बेनामी संपत्तीच्या खरेदी विक्री संदर्भात ही छापेमारी करण्यात आली होती. दिल्ली, मुंबई, कोलकाता, वाराणासी, कानपूर आणि लखनऊमध्ये त्यावेळी छापेमारी करण्यात आली होती. यावेळी आझमी यांच्यावर 160 कोटींच्या टॅक्स चोरीचा आरोपही करण्यात आला होता.
10 महिने तपास सुरू
या ठिकाणांवरून अनेक महत्त्वाची कागदपत्रे आयकर विभागाच्या हाती लागली होती. त्याचा गेली 10 महिने तपास सुरू होता. त्यानंतर काल मुंबई, वाराणासी आणि लखनऊमध्ये छापेमारी करणअयात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाराणासीतील विनायक ग्रुपच्या ठिकाणांवरही छापेमारी करणअयात आली आहे. हा विनायक ग्रुप समाजवादी पार्टीचे माजी महासचिव गणेश गुप्ता यांचा आहे. गणेश गुप्ता यांचं निधन झालं असून हा ग्रुप आता त्यांचे कुटुंबीय चालवत आहेत. या ग्रुपचे वाराणासीत आलिशना मॉल, गगनचुंबी निवासी इमारती आणि शॉपिंग कॉम्प्लेक्सही आहेत.
अचानक धाडी
दरम्यान, कालच्या धाडीत आयकर विभागाच्या हाती काय लागलं याची माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, अचानक आयकर विभागाने एकाचवेळी तीन शहरात धाडी मारल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता आयकर विभाग काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.