Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावरील १२ जणांच्या मृत्यूस आरटीओ जबाबदार; दोन अधिकाऱ्यांना अटक
Samruddhi Highway Accident news updates : समृद्धी महामार्गावर रविवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघात १२ जण ठार झाले होते. एका ट्रकला पाठीमागून बस धडकल्याने हा अपघात झाला होता. दरम्यान, हा ट्रक आरटीओने थांबवल्याचे स्पष्ट झाले असून दोघा अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
Samruddhi Highway Accident update: बुलढाणा जिल्ह्यातील सैलानीबाबाच्या दर्शनासाठी गेलेल्या नाशिक येथील भाविकांच्या गाडीचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला होता. यात १२ प्रवासी ठार तर २३ जण जखमी झाले होते. या अपघातामुळे पुन्हा समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. दरम्यान, हा अपघात आरटीओ पोलिसांच्या चुकीमुळे झाल्याचे पुढे आले आहे. दोन आरटीओ अधिकाऱ्यांनी हा ट्रक महामार्गावर थांबल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दोन अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
दीप राठोड, नितीनकुमार गणोरकर असे निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचे नाव आहे. हे दोघेही आरटीओ असिस्टंट इन्पेक्टर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आरटीओ हे भरधाव वेगात असलेल्या ट्रकचा पाठलाग करत होते. त्यांनी टोलनाक्यापासून ट्रकचा पाठलाग करून हा ट्रक पकडला. तसेच हा ट्रक महामार्गावरच रस्त्याच्या कडेला उभा करण्यास सांगितला होता.
यावेळी पाठीमागून भविकांची ट्रॅव्हलर बस या ट्रकला धडकली. यामुळे झालेल्या भीषण अपघातात १२ जण जागेवर ठार झाले होते तर २३ जण जखमी झाले होते. अटक करण्यात आलेल्या दोघा अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे हा अपघात झाला असून दोन आरटीओ अधिकारी आणि चालकावर काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, या प्रकरणी तिघांना निलंबित करून प्रदीप राठोड आणि नितीनकुमार गोणारकर यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू आहे. या अपघाताबाबत आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता आहे.