हॉटेलमधून जंगलात नेलं अन् नंतर 3 वेगवेगळ्या ठिकाणी आळीपाळीने...; कर्नाटकमधील पीडितेचा दावा - latursaptrangnews

Breaking

Saturday, January 13, 2024

हॉटेलमधून जंगलात नेलं अन् नंतर 3 वेगवेगळ्या ठिकाणी आळीपाळीने...; कर्नाटकमधील पीडितेचा दावा

 

हॉटेलमधून जंगलात नेलं अन् नंतर 3 वेगवेगळ्या ठिकाणी आळीपाळीने...; कर्नाटकमधील पीडितेचा दावा


कर्नाटकातील एका हॉटेलमध्ये मुस्लीम तरुणांनी घुसून तिथे राहणाऱ्या एका मुस्लिम महिला आणि एका हिंदू पुरुषाला मारहाण केल्याचा घटनेत धक्कादायक खुलासा झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर देशात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पीडित महिलेने नवा खुलासा केल्याने घटनेला वेगळे वळण आले आहे. पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, हॉटेलच्या बाहेर फेकल्यानंतर मुस्लिम तरुणांनी तिला निर्जनस्थळी नेले आणि तेथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. (Taken from the hotel to the forest and then taken to 3 different places alternately muslim woman Victim claim in Karnataka )

पीडित महिला म्हणाले की, हॉटेलमधून तिचे अपहरण केल्यानंतर या मुस्लिम तरुणांनी तिला बाईकवर बसवले आणि जंगलात घेऊन गेले. तेथे तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. महिलेने पोलिसांना सांगितलं की, सातपैकी तीन आरोपी तरुणांनी तिला बस स्टँडवर कारमध्ये टाकले. हल्लेखोरांनी या मुस्लिम महिलेला बसमध्ये बसून सिरसीला जाण्यास सांगितले होते. ही महिला त्या ठिकाणची रहिवासी आहे.


दरम्यान, हावेरीचे एसपी अंशु कुमार यांनी माहिती दिली की, 'आम्हाला बलात्काराबाबत यापूर्वी सांगण्यात आलं नव्हतं. या महिलेच्या व्हिडीओबाबत प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तातूनच आम्हाला याची माहिती समजली आहे. आम्ही संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवला असून आता पुढील तपास करतोय.' या प्रकरणातील आरोपी कोणत्याही संघटनेशी संबंधित नसल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलंय. मात्र त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही असाच गुन्हा दाखल करण्यात आला होता, असं तपासात पुढे आलं आहे. 

No comments:

Post a Comment