लातूर शहर महानगरपालिका - राष्‍ट्रीय शहरी आरोग्‍य अभियान अंतर्गत विविध कंत्राटीपदाच्या मुलाखत प्रक्रिये बाबत... - latursaptrangnews

Breaking

Saturday, February 24, 2024

लातूर शहर महानगरपालिका - राष्‍ट्रीय शहरी आरोग्‍य अभियान अंतर्गत विविध कंत्राटीपदाच्या मुलाखत प्रक्रिये बाबत...

 

लातूर शहर महानगरपालिका - राष्‍ट्रीय शहरी आरोग्‍य अभियान अंतर्गत विविध कंत्राटीपदाच्या मुलाखत प्रक्रिये बाबत...

 


राष्‍ट्रीय शहरी आरोग्‍य अभियान व 15 व्‍या वित्‍त आयोगा अंतर्गत मंजूर असलेल्‍या नागरी आरोग्‍य केंद्र व नागरी आरोग्‍य वर्धिनी केंद्र येथील रिक्‍त असलेल्‍या वैद्यकिय अधिकारीविशेष तज्ञसाथरोग तज्ञसुक्ष्‍मजीवशास्‍त्र तज्ञबहुउद्देशीय कर्मचारीस्‍टाफ नर्स इत्‍यादी विविध कंत्राटीपदासाठी महानगरपालिके मार्फत पात्र उमेदवाराकडुन अर्ज मागविण्‍यात आले होते.

तरी वैद्यकिय अधिकारी पदासाठी एकुण 48 अर्ज ,विशेष तज्ञएकुण 11 अर्जसाथरोग तज्ञएकुण 6 अर्ज व सुक्ष्‍मजीवशास्‍त्र तज्ञपदासाठी 1  अर्ज पात्र ठरण्‍यात आला असुन सदरील पात्र उमेदवारांची मुलाखत उदया दिनांक 25/02/2024 रोजी मा.आयुक्‍त यांचे कक्षलातूर शहर महानगरपालिका,लातूर याठिकाणी सकाळी 11 ते सायं.5.30 या वेळेत आयोजीत करण्‍यात आली  आहे.

तरी सर्व पात्र उमेदवारांनी मुळ कागदपत्रासह मुलाखतीस उपस्थित रहावे असे आवाहन निवड समितीलातूर शहर महानगरपालिकालातूर द्वारे करण्‍यात येते. 

No comments:

Post a Comment