सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी लातूर जिल्ह्यातील 20 व्यक्ती, 6 संस्थांची निवड - latursaptrangnews

Breaking

Friday, March 8, 2024

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी लातूर जिल्ह्यातील 20 व्यक्ती, 6 संस्थांची निवड

 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी

लातूर जिल्ह्यातील 20 व्यक्ती, 6 संस्थांची निवड

·          मुंबई येथे 12 मार्च रोजी होणार वितरण

लातूर, दि. 8 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक, व्यक्ती यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन 2019-20, 2020-212021-22 व 2022-23 या आर्थिक वर्षातील या विविध पुरस्कारांचे वितरण मुंबई येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉमांग आर्टसजमशेद भाभा नाटयगृहएनसीपीए मार्गनरीमन पॉइंटमुंबई येथे 12 मार्च, 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तसेच मुंबईचे पालकमंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. लातूर जिल्ह्यातील एकूण 26 पुरस्कारार्थ्यांची यासाठी निवड करण्यात आली आहे.

सन 2019-20, 2020-212021-22 व 2022-23 या आर्थिक वर्षातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कारकर्मवीर पद्मश्री दादासाहेब भाऊराव कृष्णराव गायकवाड पुरस्कारसंत रविदास पुरस्कारशाहूफुलेआंबेडकर पारितोषिकडॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार या विविध पुरस्कारांची शासनाने घोषणा केली आहे. त्यानुसार लातूर जिल्ह्यातील एकूण 26 पुरस्कारार्थ्यांची निवड या चार वर्षांमधील विविध पुरस्कारांसाठी झाली आहे. त्यामध्ये 20 व्यक्ती व 06 संस्थांचा समावेश आहे. सन 2019-20 मध्ये दोन व्यक्ती व दोन संस्था, सन 2020-21 मध्ये आठ व्यक्ती व दोन संस्थासन 2021-22 मध्ये चार व्यक्ती व दोन संस्था व 2022-23 मध्ये सह व्यक्ती यांना विविध पुरस्कार जाहीर झाले आहेत.

समाज कल्याण क्षेत्रात मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी शिक्षणआरोग्यअन्याय निर्मुलनजनजागरण इत्यादी क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या व्यक्तींचा या पुरस्काराने गौरव करण्यात येत आहे. त्यामुळे समाजातील सर्व स्तरातून शासनाचे आभार व्यक्त करून निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यातील पुरस्करासाठी निवड झालेल्या सर्व व्यक्ती व संस्थाचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, सहायक आयुक्त एस. एन. चिकुर्ते यांनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment