विष्णुदास कर्वा यांचे निधन
आज लातुरात अंत्यसंस्कार
लातूर : लातूर येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सत्यनारायणजी कर्वा यांचे लहान बंधू व कर्वा उद्योग समूह व फायब्रो प्लास्टचे संचालक लक्ष्मीकांत कर्वा व योगेश कर्वा यांचे वडील विष्णुदास विठ्ठलदास कर्वा यांचे सोमवारी सायंकाळच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८९ वर्ष होते.
स्व. विष्णुदास कर्वा यांनी स्टेट बँक हैदराबादमध्येही प्रमुख रोखपाल म्हणून कार्य केले होते. ते अत्यंत मनमिळावू स्वभावाचे व धार्मिक वृत्तीचे होते. आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाच्या जीवनात त्यांच्या परिवार स्नेही प्रवृत्तीमुळे अमुलाग्र बदल झालेला आहे. लातुरातील धार्मिक, अध्यात्मिक, शैक्षणिक, औद्योगिक व सामाजिक क्षेत्रात कर्वा परिवाराचा सिंहाचा वाटा आहे. परिवारातील सर्व सदस्यांच्या या कार्यामागे प्रसिद्धिपराङमुख राहून प्रोत्साहनपर कार्य ते सतत करत आलेले आहेत.
राष्ट्रसंत स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांचे ते अनन्य भक्त होते. लातूर शहरातील त्यांच्या कथा, व्याख्यान माला आयोजनामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता.
स्व. विष्णुदास कर्वा यांची अंत्ययात्रा मंगळवारी, दि. ५ मार्च २०२४ रोजी सकाळी साडेदहा वाजता ' मधुकोश ' साईधाम या राहत्या घरापासून निघणार असून मारवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
No comments:
Post a Comment