महाराष्ट्र नागरी सहकारी बँक मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना झिरो बॅलेंस खाते सुविधा राबविणार - latursaptrangnews

Breaking

Friday, July 19, 2024

महाराष्ट्र नागरी सहकारी बँक मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना झिरो बॅलेंस खाते सुविधा राबविणार




 महाराष्ट्र नागरी सहकारी बँक मुख्यमंत्री लाडकी

बहिण योजना झिरो बॅलेंस खाते सुविधा राबविणार  
- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर दि.19-07-2024
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राचा क्रांतीकारी अर्थसंकल्प जाहीर केला, ज्यामध्ये महिला, शेतकरी, तरूण उद्योजक, ग्रामीण विकासासाठी विविध योजना जाहिर केल्या. यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जाहीर करून ज्या महिलेचे वय 21 ते 65 वर्षापर्यंत आहे. अशा एकत्र परिवारातील दोन महिलांना ही योजना लागू करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतलेला आहे. या माध्यमातून प्रत्येक महिलेला दीड हजार रूपये मिळणार आहेत. या योजनेचे महत्त्व लक्षात घेऊन राज्यातील इतर बँकाबरोबरच महाराष्ट्र नागरी सहकारी बँकही आता मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी मोफत बँक खाते काढून महिलांना आर्थिक आधार देणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी दिली.
महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, स्वावलंबी व्हावे, स्वकर्तृत्वावर सर्व क्षेत्रामध्ये भरारी घ्यावी. या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार हे अनेक योजना राबविण्याचे ऐतिहासिक काम महायुती सरकारच्या माध्यमातून करीत आहेत. एस.टी. बस तिकीटामध्ये महिलांना 50 टक्के सवलत,  मुलींचे व्यावसायीक शिक्षण 100 टक्के मोफत, याबरोबरच मध्यप्रदेशच्या धर्तीवर राज्यातील महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाव्यात या दृष्टिकोनातून 21 वर्ष वयोगटापासून 65 वर्ष वयोगटापर्यंत असणार्‍या  महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून दर महिण्याला 1500 रूपयाची अनुदान देण्याचे काम सुरू केलेले आहे. खर्‍या अर्थाने लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना सक्षम करण्याचे ऐतिहसिक काम महायुतीचे सरकार करीत आहे. त्यामुळे ही योजना सर्व सामान्यापर्यंत पोहचावी आणि या माध्यमातून राज्यासह लातूर जिल्ह्यातील महिला सक्षम व्हाव्यात या दृष्टिकोणातून महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना यशस्वीपणे राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे  लातूर जिल्ह्यातील महिलांनी या योजनेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहनही माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले आहे.

झिरो बॅलन्स खाते काढण्यासाठी एमएनएस बँकेशी संपर्क साधावा
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना या योजनेचा लाभ घेणार्‍या ईच्छुक महिलांनी महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या शाखेमध्ये झिरो बॅलेंस खाते काढून आधार कार्ड, टी.सी, रहिवासी दाखला, उत्पन्‍नाचे प्रमाणपत्र किंवा  (पांढरे रेशन कार्ड , पिवळे किंवा केशरी राशन कार्ड) व पासपोर्ट साईज फोटो, ओटीपी करीता मोबाईल घेऊन सेतू सुविधा केंद्राशी भेट घेऊन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन एमएनएस बँकेच्यावतीने करण्यात आलेले आहे.

No comments:

Post a Comment