बबन्याचा ‘ओपन जेऊ देईना अन् क्लोज झोपू देईना अन् ऊठु ही देईना'...!
मुरुड प्रतिनिधी :- सध्या मुरुड शहरामध्ये अनेक वर्षापासून मटक्याच्या अवैध धंद्यांना चालू होता काही लोकप्रतिनिधींनी त्या संदर्भात निवेदन देऊन बंद करण्यात आला होता. त्याबरोबरच काहीच दिवस झाली की त्याची सुरुवात ही करण्यात आली होती. परंतु काही कारणास्तव हे अवैध धंदे सध्या बंद करण्यात आलेली दिसून येत असल्यामुळे नागरिकात चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत विविध ठिकाणी याबाबतीत कोण घेत मटका कोण घेतो चटका अशा विविध चर्चांना ऊत आला आहे.
मुरुड शहरातील आठवडीबाजार परिसरात ‘बबन्या’ नामक सटोडीकडून खुलेआम सट्टा मटका जुगार भरविला जात असल्याची खमंग चर्चा सध्या शहरात सुरू आहे. त्याने सर्वच सटोड्यांचे दुकान बंद केले असल्याचीही जोरात चर्चा आहे. त्यामुळे ‘ओपन जेऊ देईना अन् क्लोज झोपू देईना’ असेच काहीसे चित्र शहरातील नागरिकांचे असल्याचे दिसून येत आहे.
"मटक्याची पार्श्वभूमी"
भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी पासून हा खेळ खेळायला सुरूवात झाली होती. 1950 च्या दशकामध्ये त्याची सुरूवात झाली पण पुढे यावर बंदी आली. मात्र र्क लोकप्रिय खेळ असल्याने लोकांना त्याबद्दल उत्सुकता आहे. भारतामध्ये एकूणच जुगार खेळणं हे बेकायदेशीर आहे. मात्र अनेक लोकं आपलं नशीब या खेळामध्ये आजमावत असतात. काही अंकांवर नशिबाचा खेळ जिंकणार्याला मोठी रक्कम बक्षीस म्हणून मिळत होती. आज देशात सट्टा अवैध आहे.र खत्री याने सुरू केलेल्या मटका ला सुरू करताच त्याला लोकप्रियता मिळत गेली. त्यावेळी हा खेळ 0 ते 9 पर्यंत आजपर्यंत कित्येक संशोधन करून अंकात वाढ झाली व ऑनलाईन ही व्हाट्सअप द्वारे घेण्याची सुरुवात झाली आहे .
मुरुड शहरात मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग असून सट्टापट्टी व मटका जुगार चालविणारे विविध ठिकाणी टपऱ्या, दुकाने, आठवडी बाजार, बस स्टँडच्या परिसरामध्ये, शाळेच्या आवारात, हॉटेलमध्ये, मटका गोळा करण्यासाठी एजंट ची नेमणूक केलेली आहे,सध्या फक्त उदाऱ्या गोळा करून घ्यावयास चालू असल्याचे दिसून येते. मटक्याचे दुकाने बंद करण्यात आले असल्याने शहरातील अनेक सट्टा बाजार चालविणाऱ्यांचे दुकान बंद झाल्याची माहिती आहे.मुरुड परिसरात मध्ये वावरत असलेला आप्या व बबन्या सांभाळतो असल्याचे निदर्शनात येत सरासरी दररोज कोटी रुपयांची उलाढाल करीत असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
भारतात सट्टा लावणं बेकायदेशीर आहे. मात्र, तरीदेखील भारतात छुप्या पद्धतीने सट्टेबाजारात सट्टेखोर सट्टा लावतात. अनेकदा याविरोधात पोलिसांकडून कारवाई देखील केली जाते. परंतु पोलीस प्रशासनाने कारवाई केली की काही दिवसांनी किंवा महिन्यांनी "जैसे थे वैसे "परिस्थिती निर्माण होते. तसेच प्रशासनाने कारवाई केली की टपऱ्या 'क्लोज'; मोबाईलवर खेळ 'ओपन'
मुरुड शहर आणि परिसरात उघडपणे चालणाऱ्या मटका
जुगाराच्या टपऱ्या आणि बुकी बंद असल्याचे चित्र दिसून आले. तथापि, बुकी चालक यांनी मोबाईलच्या साह्याने मटक्याचा धंदा मात्र चालू ठेवला आहे.दरम्यान ? आमचा निरोप येईपर्यंत कोणत्याही परिस्थितीत टपऱ्यांमधून उघड धंदा करू नये, यादरम्यान होणाऱ्या कारवायांना आम्ही जबाबदार नाही, असे सक्तपणे मटकाकिंगवाल्यांनी टपरीधारकांना सांगितल्याची चर्चा आहे. हा निरोप आला कोणाकडून ? याचीही मात्र जोरदार चर्चा होताना दिसून येत आहे.