देशमुखांनी 15 वर्षात पाडापाडीचे राजकारण केले - माजी आ.कव्हेकर
देशमुखांनी 15 वर्षात पाडापाडीचे राजकारण केले - माजी आ.कव्हेकर
लातूर : कव्हेकर यांच्या निवासस्थानी अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या प्रचारार्थ पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना श्री कव्हेकर म्हणाले की उजनीच्या पाणी आणण्याचे अमीत देशमुखांचे आश्वासन आश्वासनच राहील आहे. फक्त मोठ मोठ्या गप्पा याच्याशिवाय त्यांनी 15 वर्षात काहीच काम केले नाही 15 वर्षात फक्त एक काम केले ते म्हणजे याला पाड त्याला पाड व आपल राजकारण टिकवं फक्त येवढेच काम केले आहे. पुढे अर्चनाताई पाटील चाकूरकरांनी ही पत्रकारांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. यावेळी महायुतीच्या उमेदवार डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर, मौलाना फिरोज पटेल, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, माजी आ.माणिकराव जाधव, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, लालासाहेब देशमुख, डॉ.मन्मथअप्पा भातांब्रे, दिग्विजय काथवटे, महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा रागिणीताई यादव, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब देशमुख, भाजपाचे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांतराव शेळके, एमएनएस बँकेचे उपाध्यक्ष एस.आर.मोरे, बाबासाहेब कोरे, ज्योतीराम चिवडे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस निळकंठराव पवार, आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments