Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    प्रत्येक कुटुंबासाठी २५ लाख रुपयांचा विमा उतरवणार -आ.धीरज देशमुख यांचे आश्वासन








     प्रत्येक कुटुंबासाठी २५ लाख रुपयांचा विमा उतरवणार -आ.धीरज देशमुख यांचे आश्वासन

    प्रत्येक कुटुंबासाठी २५ लाख रुपयांचा विमा उतरवणार      
     -आ.धीरज देशमुख यांचे आश्वासन         
    भादा/प्रतिनिधी:आपल्या मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाचा विकास व्हावा, त्याला आर्थिक स्थैर्य मिळावे,ही माझी भावना आहे.त्या अनुषंगाने मतदार संघातील प्रत्येक कुटुंबाचा २५  लाख रुपयांचा विमा आपण उतरवू,असे आश्वासन महाविकास आघाडीचे लातूर ग्रामीण मतदारसंघातील उमेदवार आ.धीरज देशमुख यांनी दिले.       आमदार देशमुख यांनी लातूर ग्रामीण मतदारसंघात असणाऱ्या औसा तालुक्यातील टेंभी, येल्लोरीवाडी,वरवाडा व  रिंगणी येथील ग्रामस्थांशी संवाद साधला.यावेळी ते बोलत होते. श्रीपतराव काकडे,शाम भोसले, नारायण आबा लोखंडे,सदाशिव कदम यांची त्यांच्यासमवेत प्रमुख उपस्थिती होती.      ग्रामस्थांशी संवाद साधताना आ.धीरज देशमुख म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने जनतेच्या हितासाठी विविध योजना राबवल्या.नंतरच्या सरकारने योजनांची नावे बदलण्याचे काम फक्त केले आहे.निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. त्यावेळी राज्यातील सर्व महिलांसाठी एसटी बसचा प्रवास मोफत केला जाणार आहे. राज्यात बेरोजगारांची संख्या वाढली असून सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी मिळेपर्यंत प्रति महिना ४ हजार रुपये दिले जाणार आहेत.सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध आहे.तरुण,शेतकरी,शेतमजूर, महिला या प्रत्येक घटकासाठी आघाडी सरकार विविध योजना लागू करणार आहे.त्यामुळे मतदारांनी आपले मतरुपी आशीर्वाद महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे करावेत.आपल्या गावांचा विकास करून घेण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करावे,असे आवाहनही आ.धीरज देशमुख यांनी केले.     टेंबी येथील मेळाव्यास सतिश शिंदे,उदयसिंह देशमुख,वामन मोरे,अमर भोसले,शिवप्रसाद शिंदे,सुधाकर मिसाळ,हमीद सय्यद,सचिन पाटील,अकबर सय्यद,रसूल सय्यद यांची उपस्थिती होती. येल्लोरीवाडी येथे सरपंच शरद सर्जे,उपसरपंच केशव सर्जे, दशरथ सर्जे,सुधीर सर्जे,नारायण सर्जे,दीपक सर्जे,बाळासाहेब सर्जे,श्रीमंत सर्जे,मारुती चिंचोलकर तर रिंगणी येथे सुरेश आबा पाटील,श्रीहरी आबा रोंगे,धनु महाराज रिंगणीकर, रामराजे रोंगे,विठठल रोंगे, अनिकेत रोंगे,आत्माराम बोचरे,सुभाष गाडेकर,खंडू रोंगे, दत्ता भोसले,अंकुश रोंगे                  यांच्यासह ग्रामस्थ आणि मतदारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad