आ.धीरज देशमुख यांचा मतदारांशी संवाद रेणापूर तालुक्यात विविध गावांत नागरिकांच्या भेटीगाठी
आ.धीरज देशमुख यांचा मतदारांशी संवाद
रेणापूर तालुक्यात विविध गावांत नागरिकांच्या भेटीगाठी
रेणापूर/प्रतिनिधी:लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आ.धीरज देशमुख यांनी तालुक्यातील विविध गावांत दौरा करत मतदारांशी थेट संवाद साधला. यावेळी भविष्यातील विविध योजनांबाबतही त्यांनी नागरिकांना माहिती दिली.
तालुक्यातील बिटरगाव, फरदपूर,गरसुळी,दामोदर तांडा, लखमापूर,मोरवड येथे आ.
देशमुख यांनी मेळावे घेतले.
यादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना आ.देशमुख म्हणाले की,राज्यातील महायुती सरकारने आजपर्यंत केवळ फसवेगिरी केली.खोटी आश्वासने दिली.परंतु महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर जनहिताच्या योजना राबविणार आहे.प्रत्येक नागरिकाला आरोग्य सेवा मोफत देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे.प्रत्येक घरातील प्रत्येक माणसाच्या आरोग्याची काळजी सरकार करणार आहे.त्यामुळे कुटुंबांचा आर्थिक भार मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचे आ. देशमुख म्हणाले.
लोकहितासाठी काँग्रेसला मतदान करा.लोकसभा निवडणुकीपेक्षा अधिक गांभीर्याने मतदान करून कॉंग्रेस व महाविकास आघाडीला सत्तेमध्ये आणा.संपूर्ण महाराष्ट्रात जनता महायुती सरकारच्या विरोधात आहे.या युतीला सत्ता मिळ न देण्याचा निर्धार जनतेने केला असल्याचेही आ.धीरज देशमुख म्हणाले.
प्रत्येक गावात आ.धीरज देशमुख यांनी अबालवृद्ध,महिला व तरुणांशी संवाद साधत त्यांची मने जिंकून घेतली.आ.देशमुख यांच्या या दौऱ्यास मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महाविकास आघाडीचे तालुक्यातील पदाधिकारी यावेळी आ.देशमुख यांच्या समवेत उपस्थित होते.
No comments